‘मी मुद्दाम मेहबुबा मुफ्तीच्या बाजूला बसलो..’, उद्धव ठाकरेंनी सगळंच सांगून टाकलं!
पाटणामधील बैठकीत उद्धव ठाकरे हे मेहबुबा मुफ्तींच्या बाजूला बसल्याने त्यांच्यावर भाजपकडून टीका केली जात आहे. याचबाबत ठाकरेंनी स्वत: याबाबत नेमकं स्पष्टीकरण दिलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत शाखाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की, ‘पाटण्याच्या बैठकीत मी मुद्दाम मेहबुबा मुफ्तीच्या (Mehbooba Mufti) बाजूला जाऊन बसलो..’ कारण याच मुद्द्यावरुन भाजपकडून (BJP) उद्धव ठाकरेंवर कालपासून टीका करण्यात येत आहे. ज्याला आता ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. (deliberately sat next mehbooba mufti shiv seen ubt chief uddhav thackeray bjp criticizing)
ADVERTISEMENT
‘मुद्दाम मेहबुबा मुफ्तीच्या बाजूला बसलो..’ उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
‘कोरोना काळात एकाही मृतदेहाची विटंबना आम्ही होऊ दिली नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करतायेत.. अरे निर्लज्जांनो.. मोदी साहेब नसते तर त्यांनी लस शोधली.. मी कधीच म्हटलं नाही की, मी लस शोधली. मोदींनी काय केलं घंटा बडवा, थाळ्या वाजवा, कोलांट उड्या मारा, बेडूक उड्या मारा.. त्यामुळे आम्ही वाचलो का?’
‘हिंदुत्व.. हिंदुत्व.. म्हणे.. काल मी गेलो होतो.. बघितलं मेहबुबा मुफ्ती आहेत. मी मुद्दाम त्यांच्या बाजूलाच जाऊन बसलो. हो आता कारण ते भाजपच्या लाँड्रीतून स्वच्छ झालेले आहेत. त्यांच्या बाजूला बसले की, आपण आजूबाजूचे पण स्वच्छ होऊ. म्हणजे तुमच्या बरोबर गेला की, स्वच्छ.. काय बेंबीच्या देठापासून बोलत होते देवेंद्र फडणवीस.. मग आम्ही प्रश्न विचारले तेव्हा मिरच्या का झोंबल्या तुम्हाला?’
‘तुम्ही जेव्हा मेहबुबा मुफ्तींसोबत बसला होतात तेव्हा तुमचं हिंदुत्व सुटलं होतं का? नाही ना सुटलं.. मग आमचं कसं सुटेल? आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. पण तुमचा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडणार.’
हे वाचलं का?
‘काल मी मेहबुबा मुफ्तींना विचारलं की, आम्ही काँग्रेसबरोबर गेलो असं म्हणत आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणतात तेव्हा मी त्यांना तुमचं उदाहरण देतो. त्या म्हणाल्या.. हो मी ऐकलंय.. मी म्हटलं एक सांगा.. ते निर्लज्ज आहेत. ते तुमच्या बरोबर आले.. तुम्ही कशा त्यांच्याबरोबर गेल्या.’
‘त्यांनी सांगितलं की, भाजपने आम्हाला वचन दिलं होतं की, 370 कलम ते काढणार नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो. या काही गोष्टी भेटल्याशिवाय कळत नााही.’
हे ही वाचा >> ‘देवेंद्रजी तुमच्या परिवाराचेही WhatsApp चॅट…’, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी डिवचलं
‘ओमर अब्दुला जे बोलले ते फार महत्त्वाचं होतं. ते म्हणाले ठीक आहे 370 कलम काढलं. पण पाच-सहा वर्ष होऊन गेली. पण अजूनही काश्मीरमध्ये निवडणुका का नाही घेतल्या जात?’
‘आता त्या काश्मीरचे तीन तुकडे केले आहेत मग निवडणुका का घेत नाही? मणिपूर जळतंय.. भयंकर परिस्थिती आहे. हजारो पोलीस असून देखील मणिपूर नियंत्रणात येत नाहीए. ज्या तिकडे मणिपुरात.. तिकडे हिंदू मरत नाही एका?’
ADVERTISEMENT
‘माझ्या जर का तुम्ही मेहबुबा मुफ्ती बाजूला बसल्या म्हणून बोंबलत असाल तर मला देवेंद्रे फडणवीसांना सांगायचं आहे की, असे फोटो माझ्याकडे देखील आहेत. पंतप्रधान मोदी तुमचे नेते आहेत की नाही? बघा.. सावरकरांच्या साथीने (मेहबुबांसोबतचा फोटो दाखवत) अमित शाह तुमचे नेते आहेत की नाही?’
‘तर आता केवळ मी मेहबुबा मुफ्तींच्या बाजूला बसलो म्हणून माझ्यावर टीका करता.. मी मुद्दामहून बसलो.. मी परत एकदा सांगतो.. मी मुद्दाम बसलो. पण हे तुमच्या नेत्यांनी केलं आहे. मग त्यांनी केलं.. आणि नंतर आम्ही केलं.. आता तुम्ही म्हणता आम्ही तुमच्या नेत्यांवर टीका करतोय.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Pune MPSC: दर्शना पवारची राहुलने केली दगडाने ठेचून हत्या?, धक्कादायक माहिती समोर
‘जर मी गुन्हा केला असं म्हणत असाल तर तुमचे नेते गुन्हेगार आहेत हे सगळ्यात आधी मान्य करा. अगदी मोदी आणि शाह यांनी गुन्हा केलाय अपराध केला आहे. मग उद्धव ठाकरे गुन्हेगार आहे असं म्हणा. पण आज संपूर्ण देशात तुम्ही हुकूमशाह म्हणून उभे राहता. सैतानाचे रुप आपल्यासमोर असताना त्या सैतानाला आपल्याला गाडावाच लागेल.’
‘दोन दिवसांपूर्वी मिंधे तिकडे गेलेत.. निर्लज्जम सदा सुखी… उद्धव ठाकरेविषयी यांच्या मनात किती विष भरलं आहे. मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली. साहेबांचा फोटो आहे तरी वरुन हातोडा मारत आहेत. असा एक तरी हातोडा तुम्ही भाजप नेते किंवा कार्यकर्तांवर मारायची हिंमत दाखवा.’
‘मिंधेंना म्हणा.. तुमची शेपूट एवढी आत गेली असेल अरे… अरे.. अरे… आम्हाला माहितीच नव्हतं तुमची शेती एवढी आत गेली आहे. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवता.. एवढी आत गेली शेपूट?’
‘कोरोना काळात कुठेही पैशाची अफरातफर न करता आपण लोकांचे प्राण वाचवले. तुम्ही अगदी बोंबलत होता. तुमचा तो बसला भाडोत्री राज्यपाल म्हणून.. मला पत्र लिहिलं होतं. की, तुम्हाला असा काय साक्षात्कार होतो का? मंदिरं उघडा, मंदिरं उघडा.. मी नाही उघडली मंदिरं.. सर्वधर्मीयांची नाही उघडली.. मला अभिमान वाटतो.. मी जे-जे सांगितलं ते-ते माझ्या महाराष्ट्राच्या जनतेनं ऐकलं.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्ला केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT