Ajit Pawar: अजितदादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाहीच; पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्याचे मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने सहा आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली आहे
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे राजीनामा देणार?

"तर कुणाचीही गय करण्याचं कारण नाही..."

उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्याचे मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने सहा आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली आहे. विरोधकांकडून मुंडेच्या राजीनाम्याबाबत सूर आवळला जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "कोणत्याही चौकशीत तुमच्यावर आरोप झाला की, तुम्ही अमूक अमूक केसमध्ये दोषी आहेत. तर आज एसआयटीची चौकशी चालू आहे. आज सीआयडीची चौकशी चालू आहे. आज न्यायालयाच्या तिथे चौकशी चालू आहे. या तीन वेगवेगळ्या एजन्सी तिथे चौकशी करत आहेत. त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: सांगितलेलं आहे, ही चौकशी करत असताना, जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधीत असेल, ते तिथं सिद्ध झालं, तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल", अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्याचे संकेत दिले आहेत.
पत्रकार परिषदेत अजित पवार पुढे म्हणाले, या संदर्भात मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलं आहे, यासंदर्भात पक्ष वगैरे न बघता,जर कोणी वरिष्ठ लेव्हलला काम करणारा व्यक्ती यामध्ये दोषी असतील, तर कुणाचीही गय करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री म्हणाले मी त्याही मताचा आहे. त्यामुळे चौकशी चालू आहे. आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला. प्रत्येकाची चौकशी केली जाईल. फोनवर काय काय संभाषण झालं ते सगळं समजतं. अशाप्रकारच्या घटना आम्ही महाराष्ट्रात अजिबात खपवून घेणार नाही. ही निर्घृणपणे झालेली हत्या आहे. यामध्ये सरकारने गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. विरोधी पक्षाच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना बोलत असताना कुणावर अन्याय होऊ नये, ही पण खबरदारी घ्यावी लागते. यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जे दोषी असतील त्यांना अजिबात पाठिशी घालणार नाही. त्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल. वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रात दिला जाईल.
हे ही वाचा >> Supriya Sule : वाल्मिक कराडवर PMPLA का लावला नाही? ED ची नोटीस येऊनही कारवाई का नाही? सुळेंनी 2022 चं प्रकरण काढलं
"देशपातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नावलौकीक आहे. त्या विद्यापीठाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अमृत महोत्सवानिमित्त काही चांगल्या गोष्टी करायच्या, असं तिथल्या सहकाऱ्यांना समजावून सांगण्यासाठी तास दीड तास वेळ दिला होता. तिथे मुला-मुलींचं होस्टेल, ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल करण्याबाबतचे प्रश्न त्यांनी मांडले. मी त्यांना सांगितलं की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथराव, चंद्रकांतदादा आम्ही सगळे मिळून यातून मार्ग काढून देतो, अशाप्रकारचं सुतोवाच त्यांनी केलं.जनतेनं कुठं जागा ठेवली नाहीय. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ नये, याबद्दलची खबरदारी आम्हाला घ्यावीच लागणार आहे. ती आम्ही घेणार. त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही", असंही अजित पवार म्हणाले.