Eknath Khadse: ‘देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक छळ केला’, खडसेंचा खळबळजनक आरोप
Eknath Khadse sensational allegationon Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमुळे महाराष्ट्रातील राजकारण हे प्रचंड गढूळ झालं. तसेच त्यांनी माझा वैयक्तिक छळ केला. असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी अकोल्यात बोलताना केला आहे.
ADVERTISEMENT
devendra fadnavis did personal harassment sensational allegation of eknath khadse maharashtra news politics
Latest political news Maharashtra: धनंजय साबळे, अकोला: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 2014 मध्ये राज्याच्या राजकारणात ठळकपणे झालेल्या ‘एंट्री’नंतर राज्यातील राजकारण गढूळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) केला आहे. ते अकोला येथे बोलत होते. फडणवीसांनी आपल्याला वैयक्तिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर होत असलेल्या उधळपट्टीवर देखील खडसेंनी टीका केली आहे. (devendra fadnavis did personal harassment sensational allegation of eknath khadse maharashtra news politics)
खडसेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप..
‘मी राज्याचं राजकारण गेल्या चाळीस वर्षांपासून पाहतोय. मी आता सातव्यांदा आमदार आहेत. मात्र, राज्याच्या राजकारणाचा स्तर 2014-15 पासून प्रचंड खाली गेला आहे. 2019 नंतर तो आणखी घसरला आहे. आधी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंसारखे लोक मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी कधीही आपला संयम सोडला नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणाची दिशा बदलली. एकमेकांचं उट्टं काढणं, सूड उगवणं.. अशा स्वरूपाचं राजकारण येथे सुरू झालं.’ असा गंभीर आरोप खडसेंनी यावेळी केला.
हे ही वाचा >> फसवणुकीचा अमृतकाल! ‘सामना’तून शिंदे सरकारचे वाभाडे
‘मला विरोध करतो का तुला बघून घेऊ असं राजकारण सुरू झालं. यासाठी ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा शस्त्रांचा वापर राजकारणात केला जाऊ लागला. देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझाच हात होता. 2014 पूर्वी मीच विधानसभेत त्यांना माझ्या मागची जागा दिली होती. अनेक चर्चांमध्ये माझ्याऐवजी त्यांना संधी दिली होती. अनेक प्रश्न त्यांनी त्यांच्या कौशल्याने उचलले. नंतरच्या कालखंडात त्यांनी कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, मला या गोष्टीचं दु:ख आहे की, ज्या माणसाला प्रदेशाध्यक्ष करण्यात मोठी मदत केली, त्यामुळेच ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले. पुढे त्यांनीच व्यक्तिगतरित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे चांगलं नाही.’ असं म्हणत खडसेंनी आपल्या मनातील सल यावेळी बोलून दाखवली.
‘पंकजा मुंडे मात्र अद्याप संभ्रमावस्थेत’
दरम्यान, यावेळी खडसेंनी कधीकाळी त्यांचे सहकारी असलेल्या तावडे आणि पंकजा मुंडेंबाबत देखील यावेळी भाष्य केलं. ‘विनोद तावडे सावरलेत, ते महाराष्ट्र सोडून दिल्लीला गेलेत. पंकजा मुंडे मात्र अद्याप संभ्रमावस्थेत आहेत. त्या सध्या तीर्थाटनाच्या भ्रमातच फिरत आहेत. त्यामुळे त्या निर्णय घेऊ शकत नाहीत. नाथाभाऊंनी निर्णय घेतला अन् आपली दिशा ठरवली. आपला वेगळा मार्ग अवलंबला. पंकजा मुंडे यांना वडीलकीच्या नात्याने सध्या कोणताच सल्ला देणार नाहीय. त्या स्वत: परिपक्व आहेत. त्या परिस्थितीनुसर अधिक परिपक्व होत चालल्या आहेत.’ असंही खडसे यावेळी म्हणाले.
‘तो खोक्यावाला आमदार आहे…’
‘जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे विरुद्ध सारे असं चित्र आहे. चंद्रकांत पाटील हे खोक्यावाले आमदार आहे. नया है वह, अभी अकल कम है. कुणाला नरकासुर म्हणायचं, कुणाला बकासुर म्हणायचं हे त्यालाच माहीत बिचाऱ्याला. मात्र, तो तरी एका जाग्यावर थांबतो का? अपक्ष म्हणून विधानसभा राष्ट्रवादीच्या मदतीनं जिंकली. नंतर उद्धव ठाकरेंसोबत गेला, आता शिंदेसोबत गेला. त्याला फार भाव देण्यात अर्थ नाही.’ असं म्हणत खडसेंनी आमदार चंद्रकांत पाटलांचा देखील खरपूस समाचार यावेळी घेतला.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT