Devendra Fadnavis: "अरे वेड्यांनो...", देवेंद्र फडणवीस महायुतीतील वाचाळ नेत्यांवर संतापले

मुंबई तक

Devendra Fadnavis Mukhyamantri Majhi Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबद्दल महायुतीतील काही नेत्यांनी केलेल्या विधानांनी वाद निर्माण झाला. त्या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी सुनावले.

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
देवेंद्र फडणवीस महायुतीतील वाचाळ नेत्यांना काय म्हणाले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मित्रपक्षाच्या नेत्यांना फडणवीस काय म्हणाले?

point

माझी लाडकी बहीण योजनेबद्दल फडणवीसांचे भाष्य

point

फडणवीसांनी विरोधकांनाही सुनावले खडेबोल

Devendra Fadnavis News : महायुतीत असलेले आमदार रवि राणा म्हणाले की, 'आशीर्वाद (मते) दिला नाही, तर 1500 रुपये परत घेऊ.' दुसरीकडे आमदार महेश शिंदेंनीही वादग्रस्त विधान केले. त्यामुळे विरोधकांना आयत कोलीत मिळाले. या वाचाळ नेत्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत कानउघाडणी केली. 

जळगाव येथील कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. फडणवीस म्हणाले, "परवा एक नेते म्हणाले की १५०० रुपयात काय होते? माझा त्यांना सवाल आहे की, तुम्हाला संधी मिळाली होती. फुटकी कवडीही तुम्ही आमच्या माता-भगिनींना दिली नाही. आता आम्ही १५०० रुपये देत आहोत. तुमच्या पोटात का दुखतंय? भगिनींनो, या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल. ज्यांना तुम्हाला मिळणारे १५०० रुपये पचत नाहीयेत."

हेही वाचा >> ''लाडकी बहीण' योजना थांबवू...', सुप्रीम कोर्ट शिंदे सरकारवर एवढं का संतापलं?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, "दादा (अजित पवार) म्हणाले तेही खरं आहे. आमचेही काही मित्र गंमतीत बोलताना काही बोलतात. कुणीतरी म्हणत पैसे वापस घेऊ."

महायुतीच्या नेत्यांना फडणवीसांचे खडेबोल

"अरे वेड्यांनो, या देशात भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की, त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते. त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो. निवडणुका येतील जातील. कुणी मत देईल, देणार नाही; पण मला विश्वास आहे की, मायमाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल. जोपर्यंत हे त्रिमुर्तींचं सरकार आहे, तोपर्यंत मायमाऊलींची योजना कुणाचा बाप बंद करू शकणार नाही."

हेही वाचा >> अजित पवारांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला!

लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख अर्ज

"कुणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही. कुणी आढावा घेऊ शकणार नाही. आता नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे. आढावा घेत होतो. १७ तारखेला पैसे द्यायचे आहेत. १ कोटी ३५ लाख अर्ज पूर्ण झाले आहेत. पण, त्यात असं लक्षात आले की, ३५ लाख अर्ज असे आहेत की, त्यांचे खाते आधारशी जोडलेले नाही. आता जिल्ह्याधिकाऱ्यांना सांगितलं तत्काळ करून घ्या. कारण बँकेत पैसे टाकण्यासाठी ते आधारशी जोडलेले असावे", असे फडणवीस म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp