Ravindra Waikar : "वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका", थेट लोकसभा महासचिवांना नोटीस
Ravindra Waikar : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल चांगलाच वादात सापडला आहे. आता या प्रकरणी थेट लोकसभा महासचिवांनाच नोटीस पाठवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ निकाल
रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढणार?
अपक्ष उमेदवाराचे थेट लोकसभा सचिवांना पत्र
Mumbai North West Lok Sabha 2024 : मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार कामाला लागले, तरी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा वाद निकाली निघालेला नाही. या प्रकरणात आता रवींद्र वायकर यांना लोकसभेचे खासदार म्हणून शपथ देऊ नका, अशी मागणी नोटीसद्वारे करण्यात आली आहे.
'रवींद्र वायकर यांचे निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे. पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये', अशी मागणी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत शाह यांनी केली आहे.
हेही वाचा >> अमोल कीर्तिकर 1 मताने होते आघाडीवर, मग 48 मतांनी कसे झाले पराभूत?
शाह यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत लोकसभा महासचिव उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवली आहे. लोकसभा सचिव उत्पलसिंग यांना इमेलद्वारेही हे नोटीस पत्र पाठविल्याची माहिती ॲड.असीम सरोदे यांनी दिली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
रवींद्र वायकरांच्या विजयाबद्दल काय म्हटलंय?
या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, 'भारतात पहिल्यांदा EVM मशीन मतमोजणीबाबत FIR दाखल झाला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देणे म्हणजे आर्टिकल 99 नुसार संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल.'
नोटीसपत्रात हे सुद्धा नमूद करण्यात आले आहे की, अशी मागणी यापूर्वी कुणी केली नसेल तरीही आपण शपथ देण्यामागील संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन सकारात्मक कृती म्हणून रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "शिंदे साहेब, मोदी-शाहांना सांगा", कदमांनी भाजपवरच फोडले खापर
उमेदवाराचा नातेवाईक मतमोजणी प्रक्रिया सुरु असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन हजर असतो. तो फोन ईव्हीएम मशीनसोबत जोडलेला होता, असा आरोप झाल्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेत ठरवून व काही निवडक मतदारसंघात गैरवापर करायचा, त्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरायचे आणि भाजपला सोयीचा निकाल येण्याची व्यवस्था करायची, अशी चर्चा अनेकदा होत असताना यावेळी प्रथमच अशाच संदर्भात एफआयआर दाखल झालेला आहे.
ज्या रवींद्र वायकर यांचे निवडून येणे प्रथमदर्शनीच शंकास्पद आहे, त्यांना खासदारकीची शपथ देऊ नये, उत्पलसिंग यांच्याकडे भरत शाह यांनी केली आहे.
Mumbai North West Lok Sabha : सीसीटीव्ही फूटेजचा मुद्दा
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नेस्को सेंटर या मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्याचे मुद्दाम टाळण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती हेच दाखविणारी आहे की सरकारी यंत्रणा सत्य लपविण्यासाठी रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे व केंद्र सरकारच्या दबावाखाली मदत करीत आहे, असेही भरत शाह यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा >> 'शिवसेनेला 100 जागा द्या', रामदास कदमांची भाजपकडे मागणी
निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गांचा वापर करण्याच्या या उघड प्रकरणी दाद मागण्यासाठी आता भरत शाह हे आता उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करणार आहेत.
ADVERTISEMENT