Jayram Ramesh : फडणवीसांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर, जयराम रमेश यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेत फडणवीसांना...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जयराम रमेश यांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

point

फडणवीसांनी केलेल्या टीकेवर जयराम रमेश सविस्तर बोलले

point

पंतप्रधान मोदी आणि शाहांचं नाव घेत फडणवीसांवर बरसले

Jayram Ramesh Saved Rahul Gandhi:काँग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मुंबईमध्ये महाविकास आघाडीची पहिली मोठी सभा पार पडली. तर दुसरीकडे राहुल गांधी येण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांचा संविधान सन्मान संम्मेलन या कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसंच राहुल गांधी यांच्या हातामध्ये असलेल्या लाल रंगाच्या संविधानाच्या प्रतिवरुनही त्यांनी निशाणा साधला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान म्हटलं की, निळ्या रंगाचं स्मरण होतं, मात्र राहुल गांधी यांच्या हातात लाल संविधान आहे असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. त्यावर आता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा >>Govindgiri Maharaj : "पप्पू नावाचं एक घुबड देशामध्ये सगळीकडे हिंडून हिंडून...", गोविंदगिरी महाराजांची राहुल गांधींवर टीका?

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना थेट शहरी नक्षलवादाच्या मुद्द्याकडे बोट केलं होतं. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अनेक कडव्या विचारांच्या संघटना होत्या, हा शहरी नक्षलवादाचा प्रयत्न आहे  असे आरोप फडणवीसांकडून करण्यात आले होते. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल आम्हाला आदर आहेच, पण लाल रंगाच्या माध्यमातून कुणाला इशारा देत आहात असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्याला आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हतबल झाले आहेत. तथाकथित "शहरी नक्षलवाद्यांचा" पाठिंबा घेण्यासाठी राहुल गांधी "रेड बुक" दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र फडणवीस हे भारतीय राज्यघटनेवर आक्षेप घेत आहेत, ज्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असं म्हणत जयराम रमेश यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. 

हे ही वाचा >>Amit Thackeray : पुतण्या अमित ठाकरेला उद्धव ठाकरे छुपी मदत करणार? 'या' कारणामुळे होतेय चर्चा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जयराम रमेश पुढे म्हणाले की, "हे तेच भारताचं संविधान आहे, ज्यावर RSS ने नोव्हेंबर 1949 मध्ये मनुस्मृतीची प्रेरणा घेऊन तयार केलं नसल्याचा ठपका ठेवत आक्षेप घेतला होता. हीच ती भारताची राज्यघटना आहे, जी नॉन बायोलॉलिकल पंतप्रधानांना बदलायची आहे. जर रेड बूक बद्दल बोलायचं झालं, तर देवेंद्र फडणवीसांना हे माहित असलं पाहिजे की, त्या पुस्तकात भारतातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले के.के. वेनुगोपाल यांचा अग्रलेख आहे. वेणुगोपाल हे 2017-2022 दरम्यान भारताचे ॲटर्नी जनरल होते. यापूर्वी, नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आणि स्वयंघोषित चाणक्यांनीही हेच लाल पुस्तक हाती घेतलं होतं.जेव्हा मुद्दा "शहरी नक्षल"चा येतो, तेव्हा हे देखील सांगितलं पाहिजे की, केंद्रीय गृह मंत्रालयाने 9 फेब्रुवारी 2022 आणि 11 मार्च 2020 रोजी संसदेत सांगितलं की, भारत सरकार हा शब्द वापरत नाही! त्यामुळे फडणवीसांनी आधी विचार करावा आणि मग बोलावं." जयराम रमेश यांनी आपल्या सोशल हॅण्डल्सवरुन केलेल्या या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी फडणवीसांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळतंय. या पोस्टमध्ये काही माध्यमांवर आलेल्या बातम्या दाखवल्या आहेत, ज्यामध्ये मोदी आणि अमित शाह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना लाल रंगाचं संविधान भेट देत आहेत. यावर भाजपनेते काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT