Manoj Jarange : 'ह्याला पाड आणि त्याला पाड ही आपली भूमिका...'; निवडणुकीबाबत जरांगेंची मोठी घोषणा!
Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घ्यायचा आज (सोमवार, 4 नोव्हेंबर 2024) शेवटचा दिवस आहे. त्याआधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार! नेमकं कारण काय?
मराठ्यांचा दबदबा कायम राहणार, मराठ्यांना विश्वासात घेतलं नाही की...
मनोज जरांगे पाटील यापूर्वी काय म्हणाले होते?
Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घ्यायचा आज (सोमवार, 4 नोव्हेंबर 2024) शेवटचा दिवस आहे. त्याआधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. काही जागा त्यांनी रविवारी जाहीर केल्या होत्या. तर काही नावं आज जाहीर होणार होती. पण, "मित्रपक्षांनी उमेदवारांची नावे न पाठवल्याने आपण एकाच समाजाच्या मतांवर आणि एकाच समाजाचे प्रतिनिधीत्व म्हणून निवडून जाणे योग्य ठरणार नाही," असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. (manoj jarange patil withdraws from maharashtra assembly election 2024 antarwali sarati)
ADVERTISEMENT
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार! नेमकं कारण काय?
"आपल्याला निवडणूक लढवायची इच्छा नाही. आम्ही निवडणूक प्रक्रीयेत राहिलो तरी खेळ खल्लास, आणि निवडणुकीतून बाहेर राहिलो तरी खेळ खल्लास... राजकारण आमचा खानदानी धंदा नाही, मी मतदार संघ ठरवले आहेत, फक्त उमेदवारांचे नाव ठरवायचे होते, याला माघार म्हणता येत नाही. हा थोडक्यात गनिमी कावा आहे.
हेही वाचा : Manoj Jarange Patil : 'एवढ्या वेळेस समाजाची लेकरं बना...'; कंठ दाटला, जरांगे सर्वांसमोर रडले!
समाज माझ्या लक्षात आला की माझ्या डोळ्यात पाणी यायचं... तुम्हाला ज्याला पडायचं त्याला पाडा, तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. आपले अर्ज लवकर काढून घ्या, अर्ज कोणीही ठेवू नका. कोणत्या ही अपक्षाला, राजकीय पक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला नाही. कोणत्याच जागेवर आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाहीये. राजकीय प्रक्रिया वेगळी आहे, जो 400 पार म्हणत होता, त्याने घेतलं फाटून... आंदोलन करताना 1000/ 500 असेल तरी जमतं. पण निवडणुकीत मतदानाची गोळा बेरीज करावी लागते." असं जरांगे पाटील म्हणाले.
हे वाचलं का?
मराठ्यांचा दबदबा कायम राहणार, मराठ्यांना विश्वासात घेतलं नाही की...
"मराठ्यांचा दबदबा कायम राहणार, मराठ्यांना विश्वासात घेतलं नाही की पडलाच, आता मराठ्यांना ओबीसीतुन आरक्षण दिलं नाही तर सळो की पळो करून सोडणार... कोणाच्याही प्रचाराला, कोणाच्याही सभेला जायचं नाही. मराठ्यांच्या माणसांनी मतदानाच्या दिवशी जायचं आणि आपलं मतदान करून यायचं, कोणाच्या हि मागे फिरायच नाही. गुपचुप जायचं आणि मतदान करून माघारी यायचं, ही लाईन मराठा समाजाने लक्षात घ्यावी." अशा स्पष्ट शब्दात जरांगेंनी सर्वांना सांगितलं.
हेही वाचा : Maharashtra Weather : दिवाळी संपली तरी थंडी नाहीच! राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम?
मनोज जरांगे पाटील यापूर्वी काय म्हणाले होते?
जरांगे पाटील यांनी म्हणाले होते, मध्यरात्री उशिरापर्यंत यादी आली नव्हती. आमचे 14 उमेदवार आणि इतर समाजाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत चर्चा झाली नाही. त्यांची यादी न आल्याने एकाच जातीवर निवडणूक जिंकणे सोपं नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. या समाजासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT