Eknath Shinde : "सगळं क्रेडीट नानांना...", नार्वेकरांचं अभिनंदन करताना शिंदेंनी नाना पटोलेंचं कौतुक का केलं?

सुधीर काकडे

मी सभागृहात म्हणालो होतो, की 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणेल नाही तर शेती करायला जाईल, तो शब्द आम्ही पूर्ण केल्याचं शिंदेंनी सांगितलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नाना करते प्यार तुम्हीं से कर बैठे....

point

शिंदेंची सभागृहात तुफान डायलॉगबाजी

point

नाना पटोले आमेचच, असं म्हणत टोले

राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आज होता. आज राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी अध्यक्षांचं अभिनंदन करताना भाषण केलं. या भाषणात एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक तर केलंच, पण दुसरीकडे शिंदेंनी विरोधकांवर निशाणाही साधला आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मी पुन्हा येईन... ते पुन्हा आले. पण अध्यक्षांनी काही शब्द दिला नव्हता असं म्हणत शिंदेंनी एक मिश्किल टोला मारला. मी सभागृहात म्हणालो होतो, की 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणेल नाही तर शेती करायला जाईल, तो शब्द आम्ही पूर्ण केल्याचं शिंदेंनी सांगितलं.
 

हे ही वाचा >>Rohit Pawar : "आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं किंवा एखाद्या पक्षाला B-team म्हणणं...", रोहित पवार यांचा कुणाला सल्ला?
 

"कर नाही, त्याला नाही डर... उनका नाम है राहुल नार्वेकर" असं म्हणत शिंदेंनी नार्वेकरांचं कौतुक केलं. तसंच आपण ज्या महापुरूषांची नावं घेतो, त्या सर्व महापुरूषांची पूजा या सभागृहातच होते. मुख्य पुरोहित म्हणून राहुल नार्वेकर यांचं काम करतील, ते काम त्यांना पुढे घैऊन जायचं आहे अ्सं शिंदे म्हणाले. 

"सगळं क्रेडीट नाना पटोलेंना..."

विरोधकांवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सभागृहातून गेले, पण नाना वाचले. EVM घोटाळा असता तर तुम्ही इथे नसतात नाही असं म्हणत नाना पटोलेंना टोलाही त्यांनी मारला. नाना पटोलेंचं आभार मानतो, कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं. तिथून गाडी सुरू झाली. त्यामुळे सगळं क्रेडीत तुम्हालाच आहे, ते खरं आम्ही मानतो, त्यामुळे नाना आमचे खरे मित्र. माध्यमांसमोर ते काहीही बोलत असले तरी, ते आमचेच आहे असं म्हणत शिंदेंनी नार्वेकरांच्या अध्यक्षपदाची सुरूवात कशी झाली ते सांगितलं. नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे... असा डायलॉगही शिंदेंनी मारला. 

हे ही वाचा >> शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' 11 आमदार होणार मंत्री, दोन दिग्गजांना डच्चू?

EVM वरुन होणाऱ्या आरोपांबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, 2 कोटी 48 लाख 12 हजार 627 मतं महायुतीला मिळाली, 2 कोटी 50 लाख मतं महाविकास आघाडीला मिळाली.  फक्त 2 लाखांचा फरक होता, पण तुमचे खासदार 31 आणि आम्हाला 17 खासदार मिळाले. तेव्हा बॅलेट बॅलेट का केलं नाही असा खोचक सवाल एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला केला. तेलंगणा, कर्नाटक, झारखंड जिंकलं, लोकसभेला तुम्ही जागा जिंकल्या. पण हरल्यावर तुम्ही EVM वर आरोप करतात. आधी तुम्ही शिंदे आणि महायुचीच्या नावाने आरोप करत होतात.  आता तुम्ही त्या निर्जीव EVM वर आरोप करतात. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा लोकशाहीचा विजय होतो असं तुम्ही म्हणतात. शिंदे पुढे म्हणाले की, ते एक लाल रंगाचा संविधान आणलं होतं, त्यामध्ये कोरी पानं होती असं म्हणत शिंदेंनी राहगुल गांधींना टोला मारला. तसंच पुढे ते म्हणाले की, आरोप करण्यापेक्षा, जनभावनेचा आदर करा. तुम्ही कमी असाल तरी आम्ही तुमची नोंद घेऊ. 'सत्ताधीश असो वा विरोधीपक्ष योग्य न्याय देतील अध्यक्ष' असा खास डायलॉगही शिंदेंनी मारला. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp