Pooja Khedkar: अखेर IAS पूजा खेडकर आल्या कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या मला...
IAS Pooja Khedkar Washim: IAS पूजा खेडकर या आज (11 जुलै) वाशिम जिल्ह्यात रुजू झाल्या आहेत. पुण्यातून करण्यात आलेल्या बदलीनंतर पूजा खेडकर या आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
IAS पूजा खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया
बदली प्रकरणावर काय म्हणाल्या पूजा खेडकर?
पुण्याहून वाशिममध्ये रुजू झाल्या पूजा खेडकर
IAS Pooja Khedkar first Reaction: जका खान, वाशिम: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील अरेरावी वागण्यामुळे पूजा खेडकर यांची थेट वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. मागील काही दिवसांपासून पूजा खेडकर या आपला अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करत असल्याचं पुण्यातील अधिकारी वर्गात चर्चा सुरू होती. अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित IAS पूजा खेडकर यांची तक्रार केल्याने त्यांची पुण्यातून बदली करण्यात आली. (finally ias pooja khedkar came in front of camera see what exactly she said on transfer issue while talking to the media)
ADVERTISEMENT
या सगळ्या घटनेनंतर पूजा खेडकर यांनी IAS म्हणून निवड कशी झाली यावर देखील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. तसेच त्यांच्या वडिलांची संपत्ती आणि नॉन क्रिमेलियर सर्टिफिकेट यामुळे देखील पूजा खेडकर या काहीशा अडचणीत आल्या आहेत.
हे ही वाचा>> Pooja Khedkar: प्रचंड चर्चेत होती पुण्याची IAS पूजा खेडकर, तडकाफडकी वाशिमला बदली का?
दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबई Tak ने या प्रकरणी पूजा खेडकर यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर आज (11 जुलै) पूजा खेडकर या वाशिम जिल्ह्यात रुजू झाल्या. यावेळी पहिल्यांदाच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हे वाचलं का?
'मी वाशिम जिल्ह्यात रुजू होत आहे त्याचा मला खूप आनंद आहे. मला त्याबाबत काहीही अधिकृतरित्या बोलता येणार नाही. सरकारी नियमानुसार मला ती मुभा नाही त्या विषयावर बोलण्याची. तर कृपया माल माफ करा. मला आता या विषयावर काहीही बोलता येणार नाही. आज मी अधिकृतरित्या वाशिम जिल्ह्यात रुजू झाली आहे. इकडे काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.' असं म्हणत पूजा खेडकर यांनी त्यांच्या बदलीबाबत कोणतंही भाष्य केलं नाही.
नेमकं प्रकरण काय?
व्हीआयपी नंबर प्लेट असलेल्या ऑडी कारवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहल्यामुळे पूजा खेडकर या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. नंतर असा दावा करण्यात आला की, पूजा यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबरवरही कब्जा केला होता. तिथे त्यांनी स्वत:च्या नावाचा बोर्डही लावला होता. पूजा यांच्या या वागणुकीबाबत अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याचे मुख्य अप्पर सचिवांकडे (सेवा) यांना पत्र लिहित IAS पूजा खेडकरांची तक्रार केली होती.
हे ही वाचा>> IAS Pooja Khedkar Father: वादग्रस्त कारकीर्द, 40 कोटींची संपत्ती... IAS पूजा खेडकरांचे वडील आहेत तरी कोण?
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर सचिवांना दिलेल्या अहवालानुसार, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून स्वत:साठी स्वतंत्र आसनव्यवस्था, कार, निवास आणि हवालदाराची मागणी केली होती. तर पूजाचे वडील दिलीपराव खेडकर यांनी आपल्या मुलीला या सर्व सुविधा देण्यासाठी अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर दबाव आणल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
तसेच पूजा खेडकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या चेंबरचाही 'कब्जा' घेतला होता. तिथे त्यांनी स्वत:च्या नावाचा बोर्डही लावला होता. तसेच वरिष्ठांच्या चेंबरमधून त्यांचे सामान बाहेर काढून स्वत:चे सामान तेथे ठेवले होते. या सगळ्या बाबी निदर्शनास येताच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे याबाबत तक्रार केली.
ADVERTISEMENT
कोण आहे पूजा खेडकर?
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिने 2021 ची UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती. UPSC परीक्षेत तिचा अखिल भारतीय क्रमांक 821 होता.
तिने स्वत:ला दिव्यांग घोषित करत कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयात याचिकाही दाखल केली होती. पूजाचा युक्तिवाद असा होता की अपंग उमेदवारांना एससी/एसटी उमेदवारांपेक्षा जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांनाही समान लाभ देण्यात यावा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT