CM Devendra Fadnavis यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या 12 सोशल मिडीया युजर्सविरोधात FIR, यादीत कोणकोणती नावं?

मुंबई तक

ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या डॉक्टरेट आणि संदर्भहीन व्हिडिओंच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

CM फडणवीस यांच्याविरोधात संदर्भहीन पोस्ट करणारे रडारवर

point

कारवाई करण्याचं नेमकं कारण काय?

point

FIR झालेल्या यादीत नेमकी कुणाकुणाची नावं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणारे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने 12 सोशल मिडिया युजर्सविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या डॉक्टरेट आणि संदर्भहीन व्हिडिओंच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये भारत भावला शिंदे (@Bs131B), शुद्धोधन सहजराव (@Suddhodhan74629), नागपूर काँग्रेस सेवा दल (@SevadaINGP), सौरभ सिंह चौहान (@Sbchauhan0103), मुकेश लव्हाळे यांसारख्या युजर्सवर कारवाई केली गेली आहे.तर पुढे (@MukeshLavhale), suressh.kale, प्रसाद साळवी, वरद कांकी, अमोल कांबळे, सय्यद सलीम, द स्मार्ट 230K आणि विष्णू भोटकर यांच्यावर बनावट व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा >> Manu Bhaker : मनू भाकरने मौन सोडलं, 'खेलरत्न' पुरस्काराच्या मुद्दयावर बोलली; काय आहे संपूर्ण प्रकरण?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा भारतीय राज्यघटना, लोकशाही किंवा कोणत्याही संवैधानिक संस्थेवर विश्वास नाही आणि समांतर राज्य निर्माण करणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे असं सूचवत संदर्भहीन व्हिडीओ पोस्ट करणे आणि अन्य काही चुकीचे अर्थ लावत काही पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

हे ही वाचा >> Allu Arjun Stampede Case : अल्लू अर्जून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये, आज चौकशी होणार? हैदराबादमध्ये नेमकं काय घडतंय?

भारतीय दंड संहिता (BNS), 2023 चे कलम 353 (1) (b) माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा, 2000 च्या कलम 67 अंतर्गत सीआर क्रमांक 22/2024 द्वारे, आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी जबाबदार असलेल्या सोशल मीडिया वापरकर्त्यांविरुद्ध कलम 356 (2), 192, 3 (5) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp