शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण? NCP च्या अध्यक्षपदासाठी ‘पाच’ नाव चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली.
ADVERTISEMENT
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली. “कोठेतरी थांबणे आवश्यक आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुढील अध्यक्ष कोण याबाबतचा निर्णय घ्यावा. तसंच सध्याची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आता नवी जबाबदारी नको, असं म्हणतं त्यांनी पक्षाच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. (Five names are in discussion for the post of NCP president after Sharad Pawar)
ADVERTISEMENT
दरम्यान, शरद पवार यांच्या या अचानक केलेल्या घोषणेने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सभागृहात कार्यकर्ते आणि नेते भावूक झाले असून पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह आमदार धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड हे सर्वजण भावूक झाल्याच दिसून आलं. धनंजय मुंडे यांनी पाया पडून शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. सर्व कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर येऊन पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली.
हे ही वाचा : ब्रेकिंग न्यूज: शरद पवारांच्या निर्णयानंतर हाय होल्टेज ड्रामा! जयंत पाटील ढसाढसा रडले
उत्तराधिकारी कोण? ही पाच नाव चर्चेत :
पण पवार यांनी त्यांचा निर्णय मागे न घेतल्यास त्यांचा उत्तराधिकारी कोण याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताना त्यांच्या उत्तराधिकारी घोषित केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या या घोषणेनंतर पुढे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. यात प्रामुख्याने पाच नाव पुढे येत आहेत. यातील पहिले नाव अजित पवार यांचे. दुसरे नाव सुप्रिया सुळे. तिसरे नाव प्रफुल्ल पटेल यांचे, चौथे नाव जयंत पाटील तर पाचवे नाव सुनिल तटकरे यांचे पुढे येत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ही समिती ठरवणार राष्ट्रवादीचा अध्यक्ष :
शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष ठरविण्यासाठी एका समितीची घोषणा केली आहे. ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी, पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल असा मी विश्वास व्यक्त करतो, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : Sharad Pawar : शरद पवारांची घोषणा! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार
या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच इतर सदस्य : श्रीमती फौजिया खान, अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, श्री. धीरज शर्मा, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कु. सोनिया दूहन, अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, असे असणार आहेत.
ADVERTISEMENT
माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही :
निवृत्तीची घोषणा केल्यानंतर शरद पवार म्हणाले, माझ्या सहकाऱ्यांनो, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असू आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल. जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न यांच्या सोडवणूकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल.
ADVERTISEMENT
‘सततचा प्रवास’ हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मी आपल्या भेटीसाठी सार्वजनिक कार्यक्रम, सभा-समारंभाना येत राहिल. आपणाशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आणि सरकारकडे मांडण्यासाठी माझी पायपीट अविरतपणे चालू राहिल. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. त्यामुळे आपणापासून कोणतीही फारकत नाही. मी आपणासोबत होतो आहे व शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहणार! त्यामुळे भेटत राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT