उद्धव ठाकरे बद्रीनाथला गेले, पण.. घडलं भलंतच राजकारण!
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे राज्यातील राजकारण सर्वांना माहिती असले तरी, भाजप आणि ठाकरे गटाच्या राजकारणाचीही वेगळी चर्चा केली जाते. त्यामुळेच उद्धव ठाकरे बद्रीनाथला गेल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे बद्रीनाथल आल्याचे समजताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच नरेंद्र मोदींच्या जोरदार घोषणा देऊन वातावरण तंग केले होते.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray: राज्यातील राजकारण अनेक घटनां घडामोडींमुळे ढवळून निघाले आहे. त्यातच अपात्र आमदारांचा विषयही ताजा असतानाच माजी मुख्यमंत्री (Former CM) उद्धव ठाकरे बद्रीनाथला (Badrinath) गेले आहेत. बद्रीनाथला गेलेले असतानाच तेथेही भाजप-शिवसेनेचे (BJP-Shivsena) कार्यकर्ते आमनेसामने आल्याने एकमेकांच्या नावाच्या जोरदार घोषणा सुरु झाल्या. त्यामुळे बद्रीनाथला दर्शनासाठी गेलेल्या उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा करण्यात येत आहे.
ठाकरे-भाजप आमनेसामने
राज्यातील ठाकरे आणि शिवसेना गटाच्या राजकारणाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले. आमदार अपात्रतेच्या विषयावरुन शिंदे-ठाकरे गट एकमेकांवर टीका करत असतातच. त्यातच शिंदे गटाबरोबर भाजप असल्याने त्यांच्याकडूनही उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले जाते. त्यामुळेच उद्धव ठाकरे बद्रीनाथ दौऱ्यावर असतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींच्या घोषणा दिल्या. तर उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनीही नंतर उद्धव ठाकरेंच्या नावाच्या घोषणा दिल्याने बद्रिनाथमध्येही ठाकरे-भाजप आमनेसामने आल्याचे दिसून आले.
हे ही वाचा >> Crime: मेहुणीच्या प्रेमात झालेला वेडा, दाजीने केलं भलतंच काही..
बद्रीनाथ दौऱ्याची चर्चा जोरात
बद्रीनाथला गेलेल्या उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांसमोरच शिवसैनिक आणि भाजप समर्थक आमने-सामने आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा दौरा विशेष ठरला आहे. राज्यात या दोन्ही गटांची जोरदार चर्चा होत असली तरीही बद्रीनाथला जाऊनही भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते समोर आल्याने या दौऱ्याची चर्चा सुरु झाली आहे.
‘मोदींच्या’ नावाने घोषणा
उद्धव ठाकरे आज सकाळी आपल्या कुटुंबीयांसोबत बद्रीनाथच्या मंदिरात पूजा करत असल्याचे वृत्त भाजप समर्थकांना समजले. त्यानंतर त्यांच्या या भेटीची चर्चाही जोरदार सुरु झाली. त्यानंतर काही वेळातच तिथेच भाजपच्या काही समर्थकांनी ‘मोदींच्या’ नावाने घोषणा देणे सुरु केले.
‘ठाकरेंच्या’ नावाने जयघोष
भाजप समर्थकांनी उद्धव ठाकरे दिसताच नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा दिल्याचे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना समजले. त्यामुळे तिथे दर्शनाला आलेल्या भाविकांमध्ये शिवसेनचे कार्यकर्ते उपस्थित होते. ही गोष्ट त्यांना समजताच त्यांनीही ‘ठाकरेंच्या’ नावाने नंतर जयघोष सुरु केला. त्यामुळे मंदिर परिसरातील वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण बनले होते.
हे ही वाचा >> Kalyan: भामट्याचा कहरच.. शिवाजी महाराजांचा दुर्गाडी किल्ला ‘असा’ केला स्वत:च्या नावावर
शिवसैनिकांचे मानले आभार
उद्धव ठाकरे पाहताच भाजप समर्थकांनी नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा दिल्या असल्या तरी त्यांच्या तोडीला तोड असच प्रत्युत्तर ठाकरेंच्या शिवसैनिकानीही दिले. त्यामुळे बद्रीनाथच्या पूजेनंतर उद्धव ठाकरे मंदिरा बाहेर आले. त्यावेळी त्यांना हा घडलेला प्रकार समजला. त्यामुळे त्यांनी तेथील शिवसैनिकांसोबत फोटो काढला आणि त्यांचे आभारही मानले.