‘मराठा समाजावर तुम्ही…’, गोपिचंद पडळकरांचा नाव न घेता पवारांवर हल्लाबोल

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

gopichand padalkar criticize sharad pawar on jalna obc elgar parishad maharashtra politics 
gopichand padalkar criticize sharad pawar on jalna obc elgar parishad maharashtra politics 
social share
google news

Gopichand Padalkar criticize Sharad Pawar : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आता ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेत्यांची आज जालन्यात एल्गार परिषद घेतली. या एल्गार परिषदेतून आता भाजप नेते गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा (sharad pawar) नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. तुम्ही तुमच्या नातवाला, पुतण्याला साखर कारखाने दिले आणि मराठ्यांच्या हातामध्ये उसाचा कोयता दिला, अशी टीका गोपिचंद पडळकर यांनी केली. (gopichand padalkar criticize sharad pawar on jalna obc elgar parishad maharashtra politics)

ADVERTISEMENT

भाजप नेते गोपिचंद पडळकर जालन्यातील ओबीसींच्या एल्गार परिषदेत बोलत होते. तुम्ही तुमच्या नात्यातल्या, पै पावण्यातल्या,पुतण्याला, पोराला साखर कारखाने दिले. आणि मराठ्यांच्या हातामध्ये उसाचा कोयता दिला. त्यांची पोर तुमच्याकडे नोकरी मागायला आली तेव्हा, त्या संस्था चालकांनी 40-40 लाख रूपये त्यांच्याकडे मांगितली. तुम्ही या गरीब मराठा समाजावर अन्याय केला अशी टीका पडळकरांनी नाव न घेता शरद पवारांवर केली.

हे ही वाचा : Nana Patekar : ‘नाना पाटेकरांचा चाहता, पण…’, टपली खालेल्या तरूणाने सांगितलं नेमकं काय घडलं?

मराठा समाजाची वाताहत कोणी केली, आम्ही केली, भुजबळांनी, वड्डेटीवारांनी, जाणकरांनी केली. मराठा समाजाचा नेमका शत्रु कोण आहे? मराठा समाजाचा विरोधक कोण आहे? आम्ही नाही आहोत. ओबीसी तुमचा शत्रु नाही, तुमचा नेमका शत्रु ओळखा? असे आवाहन गोपिचंद पडळकरांनी मराठा समाजाला यावेळी केली.

हे वाचलं का?

ओबीसी स्वत:च आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसींनी एकत्रित यावं. या महाराष्ट्रातला पाच कोटी धनगर समाजही तुमच्यामागे ठाम उभा आहे. घाबरायचे कारण नाही. असे देखील गोपिचंद पडळकरांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री जसे आरक्षण दिले होते, तसेच वेगळे आरक्षण मराठ्यांना द्याव. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्यावं, असे देखील पडळकर म्हणाले आहेत.

हे ही वाचा : मृतावर गोळीबार, सर्जिकल ब्लेडने केल्या जखमा, सुनेचा बदला घेण्यासाठी सासऱ्याने असा रचला कट

देशात ओबीसी आरक्षणासाठी अनेक आंदोलने उभी राहिली, त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले. या आरक्षणात काटे आणण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांना सरळ करण्याचे काम या ओबीसींमध्ये आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु ओबीसीमधील 346 जातींचे आरक्षणाला हात लावता काम नये, असे स्पष्टपणे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT