Hemant Patil : मराठा आरक्षणासाठी शिवसेना नेत्याने दिला खासदारकीचा राजीनामा

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Hingoli MP hemant patil resigned from his post.
Hingoli MP hemant patil resigned from his post.
social share
google news

Hingoli MP Hemant Patil Resigned  : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. ठिकठिकाणी नेत्यांना घेराव घातले जात आहेत. काही ठिकाणी नेत्यांना अडवले जात असून, आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांची कोंडी केली जात आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदाराला अडवण्यात आले. आंदोलकांनी राजीनाम्याची मागणी करताच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. (Hemant Patil Resigned as Member of Parliament)

ADVERTISEMENT

खासदार हेमंत पाटील हे रविवारी यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी कारखाना परिसरात होते. त्यावेळी मराठा समाजातील काही महिला आणि पुरुष आंदोलकांनी त्यांना मराठा समाजाबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट करण्याबद्दल सांगितलं. यावेळी ते आंदोलकांना म्हणाले की, “मी मंगळवारपासून दिल्लीत उपोषणाला बसणार आहे.”

मराठा आंदोलकांनी घेरलं, हेमंत पाटलांनी लिहिला राजीनामा

खासदार हेमंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतरही आंदोलकांचा पवित्रा कायम राहिला. यावेळी आंदोलकांनी त्यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटील यांनी लेटर पॅड काढून खासदारकीचा राजीनामा लिहिला. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेले राजीनामा पत्र समोर आले आहे. (Hemant Patil’s resignation as mp for Maratha reservation)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘त्यांच्या मृतदेहांवर आरक्षणाचा आदेश ठेवणार का?’, ठाकरे सरकारवर कडाडले

राजीनाम्यामध्ये काय लिहिलंय?

लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याविषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून, मी अनेक वर्षांसापासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठिंबा असून, आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.”

mp hemant patil resign letter
हेमंत पाटील यांनी मराठा आंदोलकांसमोर लिहिलेला राजीनामा.

 

ADVERTISEMENT

राजीनाम्याबद्दल बोलताना हेमंत पाटील म्हणाले की, “दिल्लीमध्ये जाऊन आपण लोकसभा अध्यक्षांना आपण राजीनामा देणार आहे”, असेही हेमंत पाटील यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

मराठा समाजाचा इशारा, राजकीय कार्यक्रम लावणार उधळून

घाटकोपर पश्चिम येथील अमृतनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आज मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण करण्यात आले. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) मुंबई युवकचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी सकल मराठा मोर्चाच्या वतीने राजकारण्यांना इशारा दिला आहे. मुंबईत सोमवारी (30 ऑक्टोबर) रोजी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर साकारात्कमक तोडगा काढण्याचा निर्णय न घेतल्यास मंगळवारपासून मुंबईतही राजकीय कार्यक्रम उधळून लावण्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा >> ‘मेल्यानंतर कुणाला…’, कुटुंबातील 7 जणांची मृत्युला मिठी, सुसाईड नोटमध्ये काय?

तसेच स्वतःच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना ही याबाबत सूचित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राजकीय कार्यकर्तेही मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अराजकीय भूमिका घेऊन आंदोलनात उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT