Lok Sabha 2024 : मोदी-शाह ‘एनडीए’ची एकजूट राहण्यासाठी ‘हा’ तिढा कसा सोडवणार?
अपना दल (एस) या आणखी एका प्रमुख घटक पक्षानेही पाच जागांवर दावा केला आहे. त्यामुळे एनडीएची एकजूट अबाधित राखण्यासाठी मोदी-शाहांना हा महत्त्वाचा तिढा सोडवणं अत्यंत कसरतीचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
Election 2024 : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी एनडीएतील जागांचा दावाही सुरू झाला आहे. ओमप्रकाश राजभर यांच्या नेतृत्वाखालील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने (सुभासपा) भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) लोकसभेच्या तीन जागा मागितल्या आहेत. आता अपना दल (एस) या आणखी एका प्रमुख घटक पक्षानेही पाच जागांवर दावा केला आहे. त्यामुळे एनडीएची एकजूट अबाधित राखण्यासाठी मोदी-शाहांना हा महत्त्वाचा तिढा सोडवणं अत्यंत कसरतीचं ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपना दल एसने मिर्झापूर, प्रतापगड, आंबेडकर नगर, फतेहपूर आणि जालौन या जागांचीही मागणी केली आहे. यापैकी मिर्झापूर आणि प्रतापगड या दोन जागा आधीच अपना दल (एस)कडे आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आंबेडकर नगर, फतेहपूर आणि जालौन या जागांवर उमेदवार उभे केले होते. यावेळी अपना दलानेही (एस) या तीन जागांवर दावा केला आहे.
वाचा >> Pune Crime : ‘तुलाही गोळी घालेन’, पत्नी-पुतण्याची हत्या, स्वतःवर झाडली गोळी, नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएच्या बैठकीत मित्रपक्षांमध्येही जागांवर चर्चा झाली. एनडीएच्या बैठकीत जागांबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिक जागांवर दावा करताना, 80 लोकसभेच्या जागा असलेल्या यूपीमधील भाजपचा मित्रपक्ष अपना दल एसच्या प्रमुख अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, आमदारांची संख्या लक्षात घेतली पाहिजे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
2014 आणि 2019 मध्ये अपना दलाला मिळाल्या होत्या 2 जागा
2014 मध्ये संयुक्त अपना दल एनडीएमध्ये सामील झाला आणि निवडणुकीच्या रिंगणातही उतरला. त्यानंतर अपना दलने मिर्झापूर आणि प्रतापगड या दोन जागांवर उमेदवार उभे केले. मिर्झापूरमधून अनुप्रिया पटेल आणि प्रतापगडमधून हरिवंश सिंग लोकसभेत पोहोचण्यात यशस्वी ठरले.
2016 मध्ये आई कृष्णा पटेल आणि मोठी बहीण पल्लवी पटेल यांच्याशी झालेल्या वादानंतर अनुप्रिया पटेल यांनी अपना दल सोनेलाल नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला. अपना दल एसने 2019 च्या लोकसभा निवडणुकाही भाजपसोबत एकत्र लढल्या होत्या.
ADVERTISEMENT
वाचा >> दोन्ही राष्ट्रवादींना घसघशीत फायदा! ठाकरे गट, काँग्रेस आमदारांचे हात रिकामे
मिर्झापूर आणि सोनभद्र या जागा 2019 मध्ये अपना दल (एस) च्या वाट्याला आल्या. अनुप्रिया पटेल मिर्झापूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचल्या. सोनभद्र येथील पकौडीलाल कौल हे देखील अपना दल (एस) च्या तिकिटावर संसदेत पोहोचण्यात यशस्वी ठरले. अपना दल (एस) चा विस्तार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनुप्रिया यांना गेल्या दोन निवडणुकांपासून दोन जागांवर अडकलेल्या पक्षाचा कोटा वाढवायचा आहे. सोनभद्रची जागा बदलण्याची मागणीही अनुप्रिया यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
सुभासपाकडून तीन जागांची मागणी
ओमप्रकाश राजभर यांचा सुभासपा गाझीपूर लोकसभा जागेसह तीन जागा मागत आहे. सुभासपाकडे सहा आमदार आहेत. अशा स्थितीत पाच जागांची मागणी करताना अनुप्रिया यांनी आमदारांची संख्या बघायला हवी अशी भूमिका घेतलीये. अनुप्रिया यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की, सहा जागा असलेल्या सुभासपाला दोन-तीन जागा दिल्या, तर त्याच प्रमाणात अपना दल (एस) लाही जागा दिल्या पाहिजेत.
भाजपकडून भूमिका अस्पष्ट
एकीकडे भाजपमध्ये एनडीएचा विस्तार वाढवण्यावर भर दिला जात आहे. पक्ष यात मग्न असताना दुसरीकडे जागांबाबतही चढाओढ वाढली आहे. सुभासपा आधीच तीन जागा मागत आहे, निषाद पक्षही दोन जागा मागत आहे. आता अपना दल (एस)नेही पाच जागांवर दावा केला आहे. या आधारावर पाहिल्यास भाजपला निवडणूक लढवण्यासाठी उत्तर प्रदेशातील 70 जागा मिळतील, हे पक्षश्रेष्ठींना मान्य असेल का? त्यामुळे उत्तर प्रदेशातील जागावाटपाचा प्रश्न कसा सुटतो हे पाहावे लागेल.
भाजपने सर्व जागा जिंकण्याचे ठेवले आहे लक्ष्य
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी पक्ष नव्या मित्रपक्षांना एनडीएत सामावून घेत आहे. यासोबतच काही कारणास्तव एनडीएशी फारकत घेतलेल्या जुन्या आघाडीतील भागीदारांना एकत्र आणण्याची कसरतही सुरू आहे.
ADVERTISEMENT