Husain Dalwai : ''उद्या कुणी प्रभू रामाबद्दल बोलले तर...'', रामगिरी महाराजांच्या विधानावर काँग्रेस नेता काय म्हणाला?
Husain Dalwai News : महंत रामगिरी यांना अटक झाली पाहीजे. आपल्या समाजात एकमेकांच्या धर्माचा आदर केला जातो. ईदला हिंदू आणि दिवाळीला मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. ही या देशाची परंपरा आणि संस्कृती आहे
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
रामगिरी महाराज यांना अटक झाली पाहिजे.
ल्या समाजात एकमेकांच्या धर्माचा आदर केला जातो.
राज्यात असा मुख्यमंत्री चालू शकत नाही.
Husain Dalwai on Mahant Ramgiri Maharaj : महंत रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलचं पेटलं आहे. याच रामगिरी महाराजांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shide) यांनी 'राज्यात संतांच्या केसांनाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही', असे सूचक विधान त्यांनी केले होते. या विधानावर आता काँग्रेस नेते हुसेन दलवाई (Husain Dalwai) यांनी आक्षेप घेतला आहे. महंत रामगिरी महाराज (ramgiri maharaj) यांना अटक झाली पाहिजे. उद्या कुणी रामाबद्दल बोलले तर चालेल का? असा सवालही दलवाई यांनी उपस्थित केला. (husain dalwai big statement criticize mahant ramgiri maharaj and eknath shide maharashtra politics)
ADVERTISEMENT
सोलापूर येथील पत्रकार परिषदेत हुसेन दलवाई बोलत होते. महंत रामगिरी यांना अटक झाली पाहीजे. आपल्या समाजात एकमेकांच्या धर्माचा आदर केला जातो. ईदला हिंदू आणि दिवाळीला मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. ही या देशाची परंपरा आणि संस्कृती आहे. या लोकांना आपली संस्कृती बदलायची आहे. मुख्यमंत्री जर अशा प्रवृत्तीला समर्थन देत असतील तर मुख्यमंत्र्यांना हटवले गेले पाहीजे, अशी मागणी दलवाई यांनी केली पाहिजे. राज्यात असा मुख्यमंत्री चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी काही तरी डोके चालवून काम करावे, अशीही टीका हुसेन दलवाई यांनी केली आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट, 'त्या' महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार?
तसेच मुख्यमंत्र्यांचा मी निषेध करतो आणि त्या महाराजांना अटक केली पाहिजे, अशी मागणी हुसेन दलवाई यांनी केली. उद्या कुणी उठलं आणि रामाबद्दल बोललं तर चालले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दलवाई पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज महाविकास आघाडीसोबत राहिला. राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी एकही जागा मुस्लिम समाजाला मिळाले नाही. त्यामुळे समाजात काहीशी नाराजी पसरली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत असे होऊ नये म्हणून समाजाकडून महाविकास आघाडीकडे आम्ही एकूण 32 जागांची मागणी करणार आहोत. यापैकी 20 जागा मिळाल्या तरी समाजाची नाराजी दूर होईल.
हे ही वाचा : Gold Price Today: अगं बाई, काय हे... केवढं महाग ते 'सोनं'! आजचा भाव बघितला का?
देशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत संसदेत 79 खासदार असणे अपेक्षित आहे. परंतु सध्या केवळ 24 मुस्लिम खासदार आहेत. जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला घेऊन आपण महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही दलवाई यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT