Sanjay Raut: '...तर राणे आणि त्यांची मुलं रस्त्यावर ना&% नाचले असते', राऊतांची राणेंवर बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

संजय राऊतांची राणेंवर बोचरी टीका
संजय राऊतांची राणेंवर बोचरी टीका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारवर टीका

point

संजय राऊतांची नारायण राणें आणि त्यांच्या मुलांवर टीका

point

राऊतांकडून नारायण राणेंवर जहरी टीका

Sanjay Raut Criticized Narayan Rane: मुंबई: सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला त्यावरून शिवसेना (UBT) चे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल तर केलाच आहे. पण याशिवाय सिंधुदुर्गचे भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर घणाघाती टीका केली आहे. 'हे जर इतर कुठल्या राज्यात झालं असतं तर नारायण राणे आणि यांची मुलं रस्त्यावर ना&% नाचले असते.. थयथयाट करत.' असं म्हणत राऊतांनी राणेंवर टीकेची झोड उठवली. (if fall of shivaji maharaj statue in another state or same incident had happened in other state then narayan rane and his children would have come to streets and razzle sanjay raut criticized rane)

'देवेंद्र फडणवीस यांच्या विकृत मनोवृत्तीमुळे...', राणेंसोबत फडणवीसांवर टीकेची झोड

काँग्रेसच्या काळातही अनेक इमारती कोसळल्या, दुर्घटना झाल्या.. अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली होती. त्यांच्या याच विधानाचा खरपूस समाचार घेत संजय राऊतांनी जोरदार टीका केली.

'त्या (नारायण राणे) माणसाला वेड लागलं आहे. मला दुर्दैवाने बोलावसं वाटत आहे. इमारती पडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला.. मग मोदींच्या काळामध्ये जो पूल कोसळला 150 लोकं मेले मोरबीला.. त्याच्यावर बोला म्हणावं.. नारायण राणे आपण खासदार आहात. आपण एक मराठी माणूस आहात, तुम्ही तरी विचार करून बोला.. कोणाची बाजू घेत आहात तुम्ही?'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Sanjay Raut: 'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नाही', संजय राऊत संतापले!

'हे जर इतर कुठल्या राज्यात झालं असतं तर हे आणि यांची मुलं रस्त्यावर नागडी नाचले असती थयथयाट करत... पण आज त्यांच्या राज्यात हा भ्रष्टाचार झाला, त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार झाला शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना. तुम्ही तिकडचे खासदार आहात.. तुम्ही रस्त्यावर उतरला पाहिजे, सरकारच्या विरोधात खरे शिवभक्त असाल तर..' 

'तुम्ही धिक्कार केला पाहिजे या सरकारचा... ज्यांनी काम करून घेतलं आणि ज्यांनी पैसे खाल्ले, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत. हे ठाणे कनेक्शन आहे. कंत्राटदार, शिल्पकार बेपत्ता आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला विचारा कुठे आहेत ही लोकं. त्यांना विचारा आपटे कुठे आहे?' असं म्हणत राऊतांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Chhatrapati Shivaji Maharaj: शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्यासाठी शिंदे सरकारने किती कोटी दिलेले?

'देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुश्मन आहेत. PWD आणि सरकारने बनवलं होतं. तुमचं सरकार जबाबदार आहे. हे तुमचं पाप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव त्यांचे शत्रू करू शकले नाही औरंगजेब करू शकला नाही अफजलखान करू शकला नाही पण भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची विकृत मनोवृत्ती त्याच्यामुळे या महाराजांना पराभव पत्करावा लागला.' अशी टीकाही राऊतांनी यावेळी केली.

ADVERTISEMENT

'शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार', राऊतांचा गंभीर आरोप

'बदलापूरची घटना ताजी असताना मालवणमधल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अशा प्रकारे कोसळणं हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे आणि फक्त निषेध करून या विषयाची फाईल बंद करता येणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे हे आता उघड झाले आहे.' 

'प्रख्यात शिल्पकार रामपुरे यांनी आज एक माहिती दिली आहे. हा पुतळा जर पडला असेल तर तो भ्रष्टाचारामुळे. देशामध्ये इतके पुतळे उभे आहेत कन्याकुमारीच्या समुद्रात, अमेरिकेच्या समुद्रात असतील, मुंबईच्या चौपाटीवर आहेत.. रंकाळा तलावामध्ये आहेत. पाण्यामध्ये असंख्य पुतळे आहेत शिखरावर आहेत पहाडावर आहेत प्रतापगडावर आहेत. 120 ताशी किलोमीटर वेगाने वाहतात वारे प्रतापगडावर ते पुतळे जागच्या जागी आहेत. 70-75 वर्षापासून पंडित नेहरू यांनी स्थापना केलेले छत्रपती शाहू महाराजांनी स्थापना केलेले पुतळे आहेत. पण एक सात महिन्यांमध्ये सिंधुदुर्गचा पुतळा पडतो कसा?' असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT