Aaditya Thackeray: एका 'आपटे'ला वाचवण्यासाठी 'शिंदेला' मारलं... 'त्या' Encounter बाबत ठाकरेंचा मोठा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Encounter बाबत ठाकरेंचा मोठा आरोप
Encounter बाबत ठाकरेंचा मोठा आरोप
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

point

बदलापूर प्रकरणातील संस्था चालकांना वाचविण्याचा सरकारचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा आरोप

point

आपटेला वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याचा ठाकरेंचा आरोप

मुंबई: मुंबईत आयोजित 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह'मध्ये बोलताना शिवसेना (UBT)नेते  आदित्य ठाकरे यांनी बदलापूर चकमकीवर मोठं विधान केलं आहे. त्यांनी बदलापूरच्या घटनेचा निषेध करत हे मानवतेच्या विरोधात आणि एकनाथ शिंदे सरकारचे अपयश असल्याचे म्हटले. तीन वर्षांच्या चिमुरडीच्या आईला एफआयआर दाखल करण्यासाठी वारंवार पोलीस ठाण्यात यावे लागत आहे, यावरून सरकारचे अपयश दिसून येतं. असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. (india today conclave shinde was killed to save an aapte aaditya thackeray crticzied to shinde govt on badlapur encounter)

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे म्हणाले, 'बदलापूरमध्ये जे काही घडले ते केवळ मानवतेच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधातच नाही तर ते सरकारचे अपयशही आहे. तीन वर्षांच्या मुलाच्या आईला एफआयआर दाखल करण्यासाठी सात दिवस पोलीस ठाण्यात यावे लागले. निदर्शने केली असता लाठीचार्ज झाला. हे राज्य सरकारचे पूर्ण अपयश आहे असे मला वाटते. पण काल घडलेल्या घटनेला तुम्ही एन्काउंटर म्हणा, हत्या म्हणा की आत्महत्या.. पण त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात.

हे ही वाचा>> Akshay Shinde Encounter : आरोपीला थांबवायला पाहिजे होतं...गोळी का चालवली? हायकोर्टाचा सरकारला संतप्त सवाल

'आपटे'ला वाचवण्यासाठी 'शिंदे'ला मारलं

दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबाबत बोलताना आदित्य ठाकरे राज्य सरकारवर एक मोठा आरोप केला. ते म्हणाले की, 'एका आपटेला वाचविण्यासाठी एका शिंदेला मारण्यात आलं.' 

हे वाचलं का?

त्याचवेळी आदित्य ठाकरे यांना शिंदे गटाकडून राजकीय सूड घेण्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, 'आमचा बदला घेण्याचा कोणताही हेतू नाही, आम्ही तसं काम करत नाही.'

हे ही वाचा>> Badlapur News: "आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही" अक्षय शिंदे असं म्हणाला अन्... 'त्या' व्हॅनमध्ये काय घडलं?

बदलापूर येथील शाळेत लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. अक्षय शिंदे सोमवारी चकमकीत ठार झाला. अक्षयने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता आणि पोलिसांवर गोळीबारही केला होता, असा पोलिसांचा दावा आहे. इंडिया टुडेच्या OSINT टीमच्या म्हणण्यानुसार, तुषार आपटे हे शाळेच्या ट्रस्टचे सचिव आहेत.

ADVERTISEMENT

जागवाटपाबाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे?

कॉन्क्लेव्ह दरम्यान, आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटप सूत्राबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की ते 'भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांपेक्षा चांगले असेल.'

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT