NCP Jalgaon Sabha : ‘…तर तुम्ही सरकारमध्ये काय करता?’; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jayant patil Jalgaon ncp sabha
Jayant patil Jalgaon ncp sabha
social share
google news

Jayant Patil : सध्या राज्यातील परिस्थिती वाईट आहे. शेतकरी, युवक आणि महिलावर्ग अनेक समस्यांनी ग्रस्त असताना सरकार मात्र आपल्यातच मश्गुल असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकावर केली आहे. जळगावमधील सभेतून बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करताना जालना आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जवरून सत्ताधाऱ्याना घेरले आहे. शांततेत चालणाऱ्या आंदोलनावर जर हे सरकार लाठी चार्ज करत असेल तर या सरकारविषयी विचार करण्याची वेळ आली आहे असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची जळगावमध्ये सभा झाली होती, त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ADVERTISEMENT

आपल्या दारात दुष्काळाचं संकट

शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडू आता शासन आपल्या दारी म्हणत लोकांपर्यंत हे सरकार जात आहे. मात्र सध्याच्या काळात शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात सापडला आहे. खानदेशातीलच शेतकऱ्यांच्या कापसाला कवडीमोलाचा भाव मिळत आहे तरीही शेतकऱ्यांकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शासन आपल्या दारी नाही तर संकट शेतकऱ्यांच्या दारी असल्याची टीका जयंत पाटली यांनी केली आहे.

शेतीचा नफा कमी झाला

एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे त्याचा फटका शेतीला बसत आहे. शरद पवार कृषी मंत्री असताना शेतीच्या पिकातून नफा मिळत होता, मात्र आता शेतीचा नफा कमी झाला आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नाथाभाऊंनी शिवधनुष्य उचलावं

जळगामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत आज मोठ्या गर्दीत सभा झाली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या जीवावर खानदेशातून आमदार खासदार कसे निवडून येतात, त्यावर बोलताना त्यांनी राजकारणातील त्यांचे वजनही दाखवून दिले. मात्र त्याचवेळी त्यांनी जळगावच्या लोकसभेचं शिवधनुष्य आता नाथाभाऊंनी उचलावं अशी त्यांनी त्यांना विनवणी केली आहे.

पवारांच्या कतृत्वावर प्रश्न

शिंदे-फडणीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्या सरकारमध्ये अजित पवारही सहभागी झाले. जे आमदार अजित पवार यांच्याबरोबर भाजप-शिंदेंसोबत गेले आहेत. तेच नेते आता शरद पवारांच्या कतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आमच्यासोबत असताना मात्र त्यांना का सुचले नाही असा सवाल त्यांनी सत्तेत सहभागी होणाऱ्यांना विचारला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT