सर्वात मोठी बातमी! फडणवीस सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, सर्व नावं वाचा एका क्लिकवर

मुंबई तक

Guardian Ministers In Maharashtra: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. फडणवीस सरकारने 37 पालमंत्र्यांची यादी जाहीर केलीय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार विराजमान झाले आहेत

ADVERTISEMENT

BJP leader Devendra Fadnavis, NCP's Ajit Pawar, and caretaker Chief Minister Eknath Shinde.
BJP leader Devendra Fadnavis, NCP's Ajit Pawar, and caretaker Chief Minister Eknath Shinde. (File photo)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फडणवीस सरकारने जाहीर केली पालकमंत्र्यांची यादी

point

धनंजय मुंडेंना बसला धक्का! बीडचे पालकमंत्री कोण?

point

सर्व पालकमंत्र्यांच्या नावाची यादी वाचा खालीलप्रमाणे

Guardian Ministers In Maharashtra:  राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. फडणवीस सरकारने 37 पालमंत्र्यांची यादी जाहीर केलीय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार विराजमान झाले आहेत. त्यामुळे सध्या चर्चेत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. मागील काळात धनंजय मुंडे यांच्याकडे बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अजित पवार पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे आणि मुंबई शहर तर चंद्रशेखर बावनकुळे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यासाठी पालकमंत्री असणार आहेत. कोणत्या मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे

1) गडचिरोली - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
2) ठाणे - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
3) मुंबई शहर - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
4) पुणे - अजित पवार, उपमुख्यमंत्री
5) बीड - अजित पवार, उपमुख्यमंत्री
6) नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
7) अमरावती - चंद्रशेखर बावनकुळे
8) अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे पाटील
9) वाशिम - हसन मुश्रीफ
10) सांगली - चंद्रकांत पाटील
11) नाशिक - गिरीश महाजन
12) पालघर - गणेश नाईक
13) जळगाव - गुलाबराव पाटील
14) यवतमाळ - संजय राठोड
15) मुंबई उपनगर - आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
16) रत्नागिरी - उदय सामंत
17) धुळे - जयकुमार रावल
18) जालना - पंकजा मुंडे

हे ही वाचा >> CM फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना मोठा हादरा, पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण...

19) नांदेड - अतुल सावे
20 ) चंद्रपूर - अशोक उईके
21) सातारा - शंभुराज देसाई
22) रायगड - आदिती तटकरे
23) लातूर - शिवेंद्रसिंह भोसले
24) नंदूरबार - माणिकराव कोकाटे
25) सोलापूर - जयकुमार गोरे
26) हिंगोली - नरहरी झिरवळ
27) भंडारा - संजय सावकारे
28) छत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाट
29) धाराशिव - प्रताप सरनाईक
30) बुलढाणा - मकरंद जाधव
31) सिंधुदुर्ग - नितेश राणे
32) अकोला - आकाश फुंडकर
33) गोंदिया - बाबासाहेब पाटील
34) कोल्हापूर - प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह पालकमंत्री)
35) गडचिरोली - आशिष जैस्वाल (सह पालकमंत्री)
36) वर्धा - पंकज भोयर
37) परभणी - मेघना बोर्डीकर 

हे वाचलं का?

    follow whatsapp