Lok Sabha 2024 : मुंबईतील तीन जागांवर डोळा, काँग्रेसच्या मनात काय?
Lok Sabha elections 2024 maha vikas aghadi Seats allocation : महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. काँग्रेसने मुंबईतील काही जागा मागितल्या असून, ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांच लक्ष आहे.
ADVERTISEMENT
Maha Vikas Aghadi Lok Sabha 2024 Seat Allocation : महाविकास आघाडी जागा वाटपाचा पेच कसा सोडवणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीने 12 जागांची मागणी करत फॉर्म्युला मांडला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 23 जागा मागितल्या आहेत. काँग्रेसने ठाकरेंची मागणीने मान्य करणं शक्य नसल्याचा सूर लावला आहे. त्यातच आता काँग्रेसची जागा वाटपाबद्दल नेमकी काय भूमिका आहे, याबद्दलची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबरोबर जागा वाटपाचं सूत्र ठरवण्यावर चर्चा होणार आहे. पण, त्यापूर्वी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी पक्षाने 15 ते 20 जागा लढवाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यात महत्त्वाची माहिती म्हणजे मुंबईतील तीन जागा लढवण्यावर स्थानिक नेते ठाम असल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईला लागून असलेल्या पालघर, भिवंडी लोकसभा मतदारसंघासह अमरावती, हिंगोली वाशिम या जागाही काँग्रेसला हव्या आहेत.
मुंबईतील लोकसभा मतदारसंघ वाटपाचा पेच
काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मुंबईतील जागांचा पेच सोडवण्याचे आव्हान आहे. शिवसेनेला मुंबईतील चार जागा हव्या आहेत. यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई हे मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. त्याचबरोबर ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या मतदारसंघांवरही ठाकरेंची सेना दावा करत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> धैर्यशील मोहिते पाटलांचा पत्ता कट, भाजपचा उमेदवार ठरला?
शिवसेनेच्या या मागणीवर काँग्रेसकडून वेगळं मत मांडलं जात आहे. मुंबईतील ज्या मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. त्यापैकी काही शिंदेंसोबत गेले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी शिवसेनेकडे विजयी होतील, असे उमेदवार नाहीत, या भोवती ही चर्चा सुरू आहे.
उत्तर मुंबईची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी
काँग्रेसकडून मुंबईतील काही जागा मागितल्या जात आहे. यात ठाकरेंकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. हा मतदारसंघ भाजपचं वर्चस्व असलेला आहे. सध्या गोपाळ शेट्टी हे खासदार आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यास महाविकास आघाडीला फायदा होईल, अशी चर्चा शिवसेनेची मातोश्रीवर झालेल्या बैठकीत झाली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंकडे उमेदवारच कुठेय? काँग्रेस नेत्याचा सवाल, शरद पवारांनाही सल्ला
मुंबईतील कोणत्या मतदारसंघात कोण आहे खासदार
ईशान्य मुंबई -मनोज कोटक, भाजप
उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी, भाजप
उत्तर पश्चिम मुंबई – गजानन कीर्तिकर, शिवसेना
उत्तर मध्य मुंबई -पूनम महाजन, भाजप
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत, शिवसेना
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे, शिवसेना
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT