Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' दिवशी मिळणार डिसेंबरचा हफ्ता, सभागृहात CM फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

CM देवेंद्र फडणवीसांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान

point

"एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही..."

point

सभागृहात फडणवीस नेमकं काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. आतापर्यंत एकूण पाच हफ्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. परंतु, महिलांना डिसेंबरच्या हफ्त्याची प्रतिक्षा लागली आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. 

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

आज या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेऊ नका. आम्ही जी आश्वासने दिली आहेत. ज्या ज्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत. एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हफ्ता त्यांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत. काहीही नवीन निकष नाहीत. पण असं लक्षात येत आहे की, काहींनी चार चार खाती उघडली आहेत. समाजात जशा चांगल्या प्रवृत्ती असतात, तशा काही वाईट प्रवृत्ती असतात.

हे ही वाचा >> Mumbai Boat Accident: बोट अपघातातील 13 मृतांची ओळख पटली, यादी आली समोर

एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीनं कोणी वापरत असेल, तर जनतेचा पैसा आहे. तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. मागच्या काळात आमच्या लक्षात आलं, माणसांनीच नऊ खाती काढली. आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं. बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. फडणवीस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, युवा, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासने असतील, समाजातील वंचितांना दिलेली आश्वासने असतील, ही सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणारच आहोत.

हे ही वाचा >> Beed News : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! पोस्टमार्टम रिपोर्टने प्रशासनाची उडवली झोप

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT