Exit Polls: 'एक्झिट पोल फालतू, फ्रस्ट्रेशन... कलही बनावट', मुख्य निवडणूक आयुक्त का म्हणाले असं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

एक्झिट पोलबाबत मुख्य निवडणूक आयुक्त का म्हणाले असं?
एक्झिट पोलबाबत मुख्य निवडणूक आयुक्त का म्हणाले असं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निवडणूक आयोगाने एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित केले आणि मीडिया संस्थांना आत्मपरीक्षण करण्याचा दिला सल्ला

point

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, सकाळी 8.50 च्या आधी कोणताही कल समोर येऊच शकत नाही

point

एक्झिट पोलबाबत असलेल्या अपेक्षांचा भंग होतो तेव्हा निराशा पदरी पडते, असंही मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले.

Exit Polls and Election Result: नवी दिल्ली: आधी लोकसभा आणि नंतर काही विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल चुकीचे आल्याने आता निवडणूक आयोगाने त्यावरून सुनावलं आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केवळ एक्झिट पोलवरच प्रश्न उपस्थित केले नाहीत तर टीव्ही चॅनेल्सना देखील सल्ला दिला आहे. (maharashtra vidhan sabha election 2024 exit polls useless frustration chief election commissioner lashed out at exit polls and hasty trends) 

मतमोजणी आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया स्पष्ट करताना ते म्हणाले की, 'कोणत्याही परिस्थितीत सकाळी 8.50 वाजेच्या आधी कोणतेही कल येण्याची शक्यताच नसते, अशावेळी 8 वाजण्याचा आधीच निकालाचे कल कसे काय दाखवले जातात?', असा खरमरीत सवाल त्यांनी विचारला.

हे ही वाचा>> Vidarbha Assembly Election 2024 Full Schedule: फडणवीसांच्या विदर्भात 'या' तारखेला आहे मतदान!

राजीव कुमार यांनी हे कल पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे आणि असंही म्हटलं की, 'एक्झिट पोल आणि मीडिया संस्थांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्या लागतील आणि आत्मपरीक्षण करावे लागेल.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एक्झिट पोल करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे: राजीव कुमार

राजीव कुमार म्हणाले, 'आम्ही एक्झिट पोलवर नियंत्रण ठेवत नाही. पण त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच गरज आहे. सॅम्पल साइज काय आहे,  सर्वेक्षण कुठे केले गेले, त्याचा निकाल कसा लागला, निकाल जुळत नसेल तर माझी काही जबाबदारी आहे की नाही? या सगळ्या गोष्टी सर्व्हे करणाऱ्यांना पाहण्याची गरज आहे. NBS सारख्या काही संस्था आहेत ज्या एक्झिट पोलचे संचालन करतात. माझ्या मते आता या संस्थांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.'

'अपेक्षा आणि वास्तव यातील फरक म्हणजे निराशा... त्याशिवाय दुसरं काही नाही.' असंही राजीव कुमार यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

'घाईघाईत दिले जातात बनावट कल'

मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले की, 'मतदान संपल्यापासून साधारण तिसऱ्या दिवशी मतमोजणी होते. पण मतदानाच्या ज्या दिवशी संपतं त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजल्यापासून सांगितलं जातं की, काय होणार आहे. लोकांना देखील वाटतं की हेच होणार आहे. परंतु यासाठी कोणताही वैज्ञानिक आधार नाही. जेव्हा मतमोजणी सुरू होते, तेव्हा सकाळी 8:05 किंवा त्याच्या अगदी 10 मिनिटातच कल दाखवले जातात. जे पूर्णपणे निरुपयोगी आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> West Maharashtra Assembly Election Full Schedules: कोण मारणार मैदान? पश्चिम महाराष्ट्रात 'या' तारखेला मतदान

'सकाळी 8.50 वाजेच्या आधीचे सर्व कल बनावट'

ते म्हणाले, 'आमची (निवडणूक आयोगाची) पहिली मतमोजणी 8.30 वाजता सुरू होते. एक्झिट पोल बरोबर सिद्ध करण्यासाठी ते असं कल तर दाखवले जात नाही ना? मतमोजणीच्या पहिल्या फेरीला 20 मिनिटे लागली तरी, सकाळी 8.50 वाजेतच्या आधी कोणताही कल समोर येणार नाही. निवडणूक आयोग 9.30 वाजता पहिला कल हा त्यांच्या वेबसाइटवर टाकतो. त्यानंतर दर दोन तासांनी मतमोजणीचे निकाल टप्प्याटप्प्याने पोस्ट केले जातात.'

'अपेक्षाभंग झाला की निराशा येते...'

राजीव कुमार म्हणाले की, 'हे सर्व एक्झिट पोलने निर्माण केलेल्या अपेक्षांमुळे घडते. दबावाखाली, कल पटकन दाखवले जातात, पण जेव्हा प्रत्यक्ष निकाल येतात तेव्हा अपेक्षाभंग होतो. तेव्हा गोंधळ निर्माण होतो. अपेक्षा आणि वास्तव यातील फरक म्हणजे निराशाशिवाय काहीच नाही.' 

यावेळी मुख्य आयुक्त असंही म्हणाले की, 'हा एक असा विषय आहे ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाचे हात बांधलेले असले तरी संबंधित संस्था याकडे नक्कीच लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.' 

हरियाणा विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला आलेले कल आणि नंतर त्याचा विपरित लागलेला निकाल यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर बरीच टीका केली होती. याच मुद्द्यावरून आज पत्रकारांनी निवडणूक आयोगाला काही सवाल विचारले होते. ज्यावर त्यांनी हे उत्तर दिलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT