Maharashtra Bandh : 'या' तारखेला महाराष्ट्र बंद! मविआचा मोठा निर्णय
Maharashtra Band Latest News: बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. मंगळवारी संतप्त नागरिकांनी रेलरोको करून प्रशासनावर दबाव टाकला होता. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं या मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
Maharashtra Bandh : 'या' तारखेला महाराष्ट्र बंद! मविआचा मोठा निर्णय
Maharashtra Bandh : 'या' तारखेला महाराष्ट्र बंद! मविआचा मोठा निर्णय
Maharashtra Bandh : 'या' तारखेला महाराष्ट्र बंद! मविआचा मोठा निर्णय
Maharashtra Band Latest News: बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. मंगळवारी संतप्त नागरिकांनी रेलरोको करून प्रशासनावर दबाव टाकला होता. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं या मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत आहे.अशातच आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आल्याचं समोर आलं आहे. येत्या २४ ऑगस्टला मविआकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.
ADVERTISEMENT
पत्रकार परिषदेत नाना पटोले काय म्हणाले?
"छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज अपमानित आणि काळीमा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचा आम्ही निषेध करतोय. या गंभीर प्रकरणाबाबत आज आम्ही चर्चा केली. येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आपण दिलेली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व मित्रपक्ष सहभागी होणार आहेत. यामध्ये शाळा, विद्यालये, डॉक्टर्स, दुकानदार आणि शाळेतील मुला मुलींचे पालक, यात सहभागी व्हावेत. महाराष्ट्रातील अकार्यक्षम आणि असंवेधानिक भ्रष्ट सरकारला खरा आरसा दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राची जनता करेल."
हे ही वाचा >> Badlapur News: आता वामन म्हात्रे म्हणतात, 'त्यांना बदलापूरमध्ये दंगल घडवायची होती'
महाराष्ट्रात सथ्या जी काही परिस्थिती आहे, ते पाहता राज्यातील लहान मुलीही आता सुरक्षित नाहीत. बदलापूरची घटना महाराष्ट्रालाच काळीमा लावणारी आहे. या घटनेला दाबण्यासाठी सरकराने स्वत: प्रयत्न केले आहेत. हे निदर्शनास येत आहे. ती संस्था आरएसएसची आणि भाजपची असल्याने आरएसएस आणि भाजपची बदनामी होऊ नये, अशाप्रकारची काळजी त्याठिकाणी घेतली गेली होती. त्याचा उद्रेक समाज माध्यमांमध्ये निर्माण झाला, असंही पटोले म्हणाले.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Ladaki Bahin Yojana: खूशखबर! ५ वर्षांपर्यंत टेन्शन घेऊच नका, पैशांनी भरणार 'इतक्या' महिलांचं खातं
बदलापूरच्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
बदलापूरचं आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं. फटाफट आंदोलन होतं तिथे स्थानिक लोक असतात. इथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते. इतर ठिकाणाहून गाड्या भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते. मंत्री महोदयांनी सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. तरीही लोक हटायचं नाव घेत नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. छोट्या मुलीची दुर्देवी घटना घडली, त्याचं राजकारण करता. ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते. कुठे असे आंदोलन असतात का? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT