Maharashtra Assembly Election 2024: महायुतीचा पाच जागांवर तिढा कायम? कोणत्या मतदारसंघांचा समावेश?
Mahayuti Candidates Latest Update: राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी येत्या 20 नोव्हेंबरला सुरु होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच रंगणार महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना
Mahayuti Candidates Latest Update: राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी येत्या 20 नोव्हेंबरला सुरु होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राजकीय मैदानात पहिल्यांदाच रंगणार आहे. तत्पूर्वी महायुतीच्या जागावाटपाचा संपूर्ण फॉर्म्युला अद्यापही निश्चित झाले नाही. महायुतीचे 288 पैकी 283 जागांवरचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. परंतु, अजूनही पाच जागांवर तिढा कायम असल्याचं समोर आलंय. आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून महायुतीने पाच जागा अजूनही निश्चित केल्या नाहीत.
ADVERTISEMENT
महायुतीचा 'या' पाच जागांवर तिढा कायम
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने 5 जागा अजूनही जाहीर केल्या नाहीत. यामध्ये मालेगाव मध्य, शिवडी, धारावी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. तर मोर्शीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत.
महायुतीत पाच जागांबाबत अजूनही खलबतं होत असल्याचं समोर येतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 51 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 78 जागांवर उमेदवार आहेत. महायुतीत भाजपचे 146, शिवसेना 78, राष्ट्रवादीचे 51 उमेदवार जाहीर करण्यात आलेत.
हे ही वाचा >> Salman Khan: सलमान खानसह मुंबईच्या 'या' आमदाराला जीवे मारण्याची पुन्हा धमकी, यामागे कुणाचा हात?
शिवसेनेच्या लिस्टमध्ये कन्नड, घनसावंगी, सिंदखेड राजा, श्रीरामपूरची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवारांना अवघ्या 51 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. महायुतीत शिंदे गटाचे 80 जागांवर उमेदवार आहे. तस महायुतीच्या मित्रपक्षांना 7 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. रिपाई,जनसुराज्य पक्षाला प्रत्येकी दोन जागा, तर राजश्री शाहू आघाडी,युवा स्वाभिमानी आणि रासपला प्रत्येकी एकच जागा मिळाली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> NCP Candidate List : शेवटच्या क्षणाला मोहोळचा उमेदवार बदलला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अखेरची यादी
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या किती जागा निवडून येतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. मविआने लोकसभेत 48 जागांपैकी एकूण 30 जागा जिंकल्या. त्यामुळे राज्यात राजकीय वर्तुळात मविआचं पारडं जड असल्याचं चित्र आहे. आता महायुती या विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT