Manoj Jarange : ''मराठ्यांची लेकरं भिकारी करण्यासाठी फडणवीसांनी...'', जरांगे कडाडले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

manoj jarange criticize devendra fadnavis maratha reservation maharashtra assembly election date declare vidhan sabha
विधानसभा निवडणुका जाहीर होताच जरांगे कडाडले!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तुम्ही सत्तेचा गैरवापर केलात

point

फडणवीस मराठा समाजाशी द्वेषाने वागले आहेत

point

मराठ्यांच वाटोळ करण्यासाठी फडणवीसांनी डाव टाकला

Manoj jarange On Devendra Fadnavis : गौरव साळी, जालना : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकाच्या तारखा जाहीर झाल्या झाल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारला इशारा दिला आहे. आणि देवेंद्र फडणवीसांवर चौफेर तोफ डागली आहे. ''तुम्ही आमची लेकरं भिकारी करण्यासाठी सगळी शक्ती लावली. तुम्ही सत्तेचा गैरवापर केलात. त्यामुळे तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला आहे. (manoj jarange criticize devendra fadnavis maratha reservation maharashtra assembly election date declare vidhan sabha) 

ADVERTISEMENT

जालन्यात जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेतून जरांगे पाटलांनी फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचं काम फडणवीसांनी केलं आहे. फडणवीस मराठा समाजाशी द्वेषाने वागले आहेत. आम्हाला त्याच दिवशी त्यांनी खुन्नस दिली होती. मी या 17-18 जाती ओबीसींमध्ये घालतो आहे. आम्ही मराठ्यांना मोजत नाही त्यांनी गिंतीत घेत नाही. मराठ्यांची दखल सुद्धा घेत नाही. आम्ही मराठ्यांना बाजूला ठेवून सत्तेवर बसू आणि मराठ्यांचं वाटोळ करू. आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. मराठ्यांच वाटोळ करण्यासाठी फडणवीसांनी सगळी डाव टाकली,असा आरोप जरांगे यांनी केला. पण  शेवटी मागण्या मान्य करायच्या की नाही हे तुमच्या हातात होतं, पण आता मतं द्यायची की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे, असा इशारा देखील जरांगेंनी महायुती सरकारला दिला.

जरांगे पुढे म्हणाले, तुम्ही आमची लेकरं भिकारी करण्यासाठी सगळी शक्ती लावली. आमची लेकरं अधिकारी झाली नाही पाहिजेत, यासाठी तुम्ही सत्तेचा गैरवापर केला. आता तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं की नाही हे माझ्या मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही,असा इशारा त्यांनी फडणवीसांना दिला. 

हे वाचलं का?

मराठा समाजाला आवाहन 

त्यांच्या 17 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना बाजूला ठेऊन ते सत्तेवर कधीच येऊ शकत नाही. त्यामुळे मी हात जोडून सर्व समाजाला विनंती करतो, आपल्या समाजाला बळ द्यायचं काम करा,100 टक्के यावेळी मराठ्यांचे मतदान झाले पाहिजे. मराठ्यांना बेदखल करण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे आपण आता पक्क ठरवायचं त्यांची जिरवायची. त्यामुळे आता लोकसभेपेक्षा जास्त ताकत दाखवा. आता प्रतिष्ठेची वेळ आलीय. मराठ्यांनी ताकदीने मतदान करा आणि आता मतातून ताकद दाखवा.मतदानाच्या आदल्या दिवशी पासून मराठ्यांनी सगळी कामं बंद करा आणि ताकदीने मतदान करा, असे आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केले आहे. तसेच जो जातीच काम करेल तो आपला हे ब्रीद वाक्य सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT