Maratha Reservation: जरांगे भुजबळांवर भडकले, ‘तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तू…’
‘मंत्री छगन भुजबळ यांनी आम्हाला स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चॅलेंज करू नये’ असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील त्यांना दिला आहे. कारण त्यांचे चॅलेंज करणं हा राजकीय स्वार्थासाठी केला जाणारा विरोध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा आणखी तीव्र झाला आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री छगन भुजबळांवर (Minister Chhagan Bhujbal) टीका करत मला चॅलेंज केलं तर मंडल आयोगाला आव्हान देणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका करताना म्हणाले की, ‘स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आव्हानं देऊ नये, कारण काहीही होऊ शकतं’ अशा भाषेत त्यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
रक्त सांडून आरक्षण नको
मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या झालेल्या पत्रकार परिषदेतून मंत्री छगन भुजबळांवर टीका करताना त्यांनी सरकारवरही हल्लाबोल केला. लाठीहल्ल्याची घटना सांगताना त्यांनी हे सरकार निर्दयी असल्याचे सांगत अमानुषपणे लाठीहल्ला करून माय-बहिणींची डोकी फोडून, रक्त सांडून मिळणारे आरक्षण आम्हाला नको म्हणत, ‘अंतरवाली सराटीत काहीही गरज नसताना त्यांनी लाठीहल्ला केला’ असंही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Dombivali : बालपणीच प्रेम नवऱ्याच्या जीवावर उठलं, धारदार शस्त्राने प्रियकराने संपवलं
सगेसोयऱ्यांच्या नोंदी
‘ज्यांच्या मराठा समाजातील लोकांच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांना सगेसोयऱ्यांच्या नोंदींवर आरक्षण मिळणार’ असल्याचे सांगत यावर कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितले. मात्र ज्या प्रमाणे भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत, तो विरोध त्यांचा राजकीय विरोध आहे. मग त्यांनी धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
हे वाचलं का?
चॅलेंज देऊ नये
याकाळात मंत्री छगन भुजबळ ज्या प्रमाणे आव्हान देत आहेत, ‘ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी चॅलेंज देत आहेत. मात्र त्यांनी असं चॅलेंज देऊ नये आणि गोरगरीब मराठा समाजातील मुलांचं नुकसान करू नये’ असं मतही त्यांनी व्यक्त केले.’
राजकीय स्वार्थ
‘छगन भुजबळांना धनगर बांधवांची मायाच असती तर धनगर बांधवांच्या आरक्षणाची त्यांनी बाजू मांडली असती. मात्र ते फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आरक्षणाचा मुद्यावर ते आव्हान देत आहे. मात्र आता त्यांनी अशी आव्हान देऊ नयेत’ अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT
कुणाचं वाटोळं नको
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले की, ‘आम्ही आता ओबीसीतून आरक्षण मिळवण्याची मागणी केली आहे. मात्र आम्हालाही कोणाचं वाटोळं करून आरक्षण घ्यायचं नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Divya Deshmukh : ‘माझे कपडे, केस आणि…’, नागपूरची बुद्धिबळपटू दिव्यासोबत काय घडलं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT