Manoj Jarange : ''समाजाला न्याय मिळाला नाहीतर उलथापालथ...'', नारायणगडावरून जरांगेंचा महायुती सरकारला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

manoj jarange patil dasara melava speech narayan gadh maratha reservation mahayuti government
मराठा समाजाची मुले प्रशासनात गेले पाहिजे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जरांगे पाटलांनी मराठा समाजाकडून एक वचन घेतले

point

मी कधीही तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही

point

तुमचे हित सोडून काम करणार नाही

Manoj Jarange Dasara melava Speech on Narayan gadh : 'मराठा समाजाला जर न्याय मिळाला नाही तर, आपल्याला या वेळी उलथापालथ करावीच लागणार, सरकारला गाडावा लागणार आहे, असा इशारा विधानसभा निवडणुकीच्या तोडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी महायुती सरकारला दिला आहे. मराठा समाजाची मुले प्रशासनात गेले पाहिजे. मात्र, त्यांना जाऊ द्यायचे नाही, अशी काही लोकांची इच्छा आहे. मात्र, आपण त्यांना अधिकारी पदावर नेल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. (manoj jarange patil dasara melava speech narayan gadh maratha reservation mahayuti government) 

ADVERTISEMENT

बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी असलेल्या शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायण गडावर मनोज जरांगेंचा दसरा मेळावा पार पाडतोय. या मेळाव्यात जरांगे पाटलांनी मराठा समाजाकडून एक वचन घेतले आहे. मी कधीही तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही आणि तुमचे हित सोडून काम करणार नसल्याचे शब्द मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला दिला आहे. मी जेवढे सांगितले तेवढेच करायचे मला वचन द्या, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. 

हे ही वाचा : Bharat Gogawle: 'चु% बनवणारी बहीण पाहिजे?', भरत गोगावलेंचं महिलेबाबत आक्षेपार्ह विधान

नाव न घेता भुजबळ टार्गेट 

आपण नारायण गडाचे खरे भक्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण तिकडे धक्क्याची भाषा वापणाऱ्यांच्या नाकावर चष्मा देखील टीकणार नसल्याची टीका जरांगे यांनी भुजबळांचे नाव न घेता केली आहे. मराठा समाज हा सहन करणारा समाज नाही. मराठा समाज हा माझ्यामुळे शांत आहे आणि मी त्यांच्यामुळे शांत आहे, असे मनोज जरांगे पाटलांनी म्हटले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पावसाचं सावट? पाहा IMD चा अंदाज

मराठ्यांच्या लेकरांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 14 महिन्यांपासून लढतोय. ते म्हणतायत तुम्ही आरक्षण मागितलं तर आमच्या आरक्षणा धक्का लागतोय. मग तुम्ही 17 जाती आरक्षणात घातल्यात तेव्हा मग धक्का लागतो म्हणनारा कुठंय.आता मला उत्तर पाहिजे 17 जाती आरक्षणात घातल्या.मग महाविकास आघाडीला विचारलं का? ज्या वेळेस आपण मागितलं तेव्हा म्हटले धक्का लागतो...17 जाती ओबीसीत घातल्यात, तेव्हा काय झालं? असा सवाल जरांगेंनी यावेळी उपस्थित केला. तुम्ही किती आंदोलन करा उपोषण करा, आम्ही दाखल घेत नाहीत अशी खुन्स दिली. म्हणून आता समोरच्याला उखडून फेकावचं लागेल, असा इशारा जरागेंनी यावेळी दिला. 

सरकारला सांगतो, ए सरकार...आचारसंहिता लागायच्या आत या राज्यातील सगळ्या जनतेच्या प्रश्नाची अंमलबजावणी करायची. जर नाही केली तर तुम्हाला सगळ्यांना आचारसंहिता लागल्यानंतर जे सांगेन ते करायचं, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर गणित विस्कटून टाकायचं, एकाकी उलटा निर्णय घ्यायचा, असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे. तुमची इच्छा जी आहे, मनात जे आहे, ती पुर्ण करायची जबाबदारी माझी आहे, असा शब्द देखील जरांगेंनी शेवटी मराठा समाजाला दिला आहे. आचारसंहिता लागण्यापुर्वी सरकारने आरक्षण जाहीर करावे, नसता आचारसंहिता लागल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार,असा अल्टिमेटम जरांगेनी सरकारला दिला आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT