Maratha Reservation : मनोज जरांगेंनी वाढवलं शिंदे सरकारचं टेन्शन, शिष्टमंडळ बैठकीत काय घडलं?
महायुतीचे संकटमोचक आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह शिष्टमंडळातील इतर नेत्यांनी आज जालन्यात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत सरकारच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
Girish mahajan meet Manoj jarange patil : महायुतीचे संकटमोचक आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह शिष्टमंडळातील इतर नेत्यांनी आज जालन्यात जाऊन मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांची भेट घेतली. या भेटीत सरकारच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. या दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये काय चर्चा झाली याचा तपशील जाणून घेऊयात. (manoj jarange patil gave 4 days time shinde fadnavis government girish mahajan meet jalana maratha reservation)
ADVERTISEMENT
गिरीश महाजन यांच्यासह संदिपान भूमरे, अर्जुन खोतकर , अतुल सावे हे सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांच्या मनधरणीसाठी जालन्यात पोहोचले होते.यावेळी गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांच्या मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. काल खूप मोठी बैठक झाली, अनेक अधिकारी, वकील उपस्थित होते. सर्वांशी चर्चा झाली. या प्रश्नावर सर्व सकारात्मक आहेत, त्यामुळे 100 टक्के मार्ग काढायचा आहे, असे जरांगे पाटलांना गिरीश महाजन यांना सांगून उपोषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा : NCP Jalgaon Sabha : ‘…तर तुम्ही सरकारमध्ये काय करता?’; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
तीन महिन्याचा वेळ कमी पडला, एक महिन्याचा वेळ द्या, आपलं काम होणार आहे. त्यामुळे जास्त न ताणता निर्णय करा. तब्येतीची काळजी करा, आपल्याला खूप लढायचं आहे, असे देखील गिरीश महाजन यांनी सांगत त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अर्जुन खोतकरांनी अण्णा हजारेंनीही आंदोलन मागे घेतल्याचा दाखला दिला. यावर कारण नसताना मी मागे का घेऊ का, ते 15 ते 20 वर्ष लढले, आमचे पण 40 वर्ष झाली ना,असे देखील जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील म्हणाले, 50 टक्क्यांचा आत येऊ नका, बर नाही येत , कोणता मार्ग 50 टक्के यात नाही. विदर्भातला सगळा मराठा 50 टक्केच्या आत आहे.खान्देश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सगळा गेलाय मग आम्ही काय केलंय, असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
गिरीश महाजन आणि राजेश टोपे यांनी समिती आंध्र प्रदेशातील मराठा समाजाच्या आरक्षणाची माहिती घेण्यासाठी तात्काळ हैदराबादला गेल्याचे सांगितले. या हैद्राबाद दौऱ्यावर मनोज जरांगे पाटील यांनी समितीला मराठवाड्यात येऊन कागदपत्रांचा अभ्यास करण्यास का सांगितले नाही? असा सवाल केला. इतर राज्यातील मराठ्यांना बिनशर्त आरक्षण मिळत असेल तर आम्ही मराठवाड्यातील मराठ्यांना का वगळले? असा सवाल देखील त्यांनी केला.
जीआर काढण्यासाठी जर मी तुम्हाला 3 महिन्यांची वेळ दिली नसती तर अजून वेळ वाढवण्याचा प्रश्नच येत नाही. मी सलाईन घ्यायला तयार आहे..मी औषध घेईन…पण आंदोलन मागे घेणार नाही…, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या नाहीतर मी मरणे पसंत करेन, अशी भूमिका देखील जरांगे पाटील यांनी मांडली. जोपर्यंत मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला जात नाही, मला जीआर देत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले.
ADVERTISEMENT
सरकारला 4 दिवसाचा अल्टिमेटम
दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने जवळपास अर्धातासहून अधिक वेळ जरांगे पाटलांच्या मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.पण जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले नाही. कारण मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. गिरीश महाजन यांनी एक महिन्याचा वेळ मागितला होता. मात्र जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले. याउलट मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 4 दिवसाचा अल्टिमेटम देत अध्यादेश देण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
सरकारला समितीचा अहवाल घ्यायचा आहे आणि तो आलाय सुद्धा, यासाठी थोडाला वेळ लागतोय.पण आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, आपण त्यांना आणखीण चार दिवसाचा वेळ दिला आहे. चार दिवसात ते आरक्षणाचा जीआर घेऊन येतील. काळजी करायची नाही आपलं आहे तसं आंदोलन सूरूच राहणार असे जरांगे पाटील यांनी आंदोलकांना सांगितले.
हे ही वाचा : Eknath Khadse : ‘अजित दादांच्या निर्णयावर फडणवीसांची सही’, एकनाथ खडसेंनी काय सांगितलं
ADVERTISEMENT