"मी जर राजकारणात आलो, तर..."; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा, नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj Jarange
Manoj Jarange
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"आम्ही एसईबीसी आरक्षण मागितलं नाही, तुम्ही..."

point

"...तर पश्चातापाची वेळ तुमच्यावर येणार नाही"

point

पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

Manoj Jarange Patil Press Conference : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या जरांगेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळांसह फडणवीसांवर निशाणा साधला. 

ADVERTISEMENT

पत्रकार परिषदेत मनोज जरांगे म्हणाले, "तुम्ही हे सर्व केलं आहे. तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. भाजपमधील गोर गरिब लोकांनाही वाटतं, लेकराचं कल्याण व्हावं. तुम्ही मराठ्यांचा द्वेष अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला राजकारणता यायचं नाही, ते मी तुम्हाला पुन्हा सांगतो. पण मी जर राजकारण आलो, तर तुम्हाला सीट निवडून देणार नाही, हे ठासून सांगतो. मला माझ्या समाजाचा अन्याय सहन होत नाही", असं म्हणत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. (Manoj Jarange Patil Criticises Chhagan Bhujbal And Devendra Fadnavis Over Maratha Reservation Issue)

मनोज जरांगे पुढे म्हणाले, आम्ही तुम्हाला विरोधक मानलं नाही. आम्हाला त्या राजकारणाची गरजच नाही. मग ती महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो. भाषा तुम्हाला समजून घ्यायची असेल तर घ्या. मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. तुम्ही ज्या केसेस केल्या, त्या पण मागे घेतल्या नाही. आमच्यावर हल्ले केले, तेही तुम्ही वाढवून ठेवलेत. मराठी आणि कुणबी एक आहे, हे ही केलं नाही. नोंदी शोधल्या आहेत. पण फडणवीस साहेब प्रमाणपत्र का देत नाहीत. सरकारी नोंदी असून प्रमाणपत्र दिलं नाही. फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sanjay Raut: 'नमक हराम' हा चित्रपट मी काढणार आहे, संजय राऊतांनी कुणावर साधला निशाणा?

"आम्ही एसईबीसी आरक्षण मागितलं नाही, तुम्ही..."

आम्ही एसईबीसी आरक्षण मागितलं नसून तुम्ही आमच्यावर लादलं. माझ्याविरोधात बोलायला दरेदकरांना तुम्ही पुढं केलं आहे. तुमच्या सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. पण तुम्ही फक्त एसईबीसीला दिली. आमच्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्या कुणबी प्रमाणपत्राला तुम्ही व्हॅलिडीटी का देत नाहीत. तिन्ही विकल्प ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलं होत. ईडब्लूएस, एसईबीसी आणि कुणबी पण ठेवा. तुम्ही पोरांचं वाटोळं करत आहात. तुम्ही म्हणता, माझ्यविरोधात गैरसमज पसरंवायला लागले आहेत.

...तर पश्चातापाची वेळ तुमच्यावर येणार नाही

आम्ही गैरसमज पसरवले नाही. यात काय खोटं आहे, ते सांगा.तुम्हाला जो पच्छाताप आला आहे, या पश्चातापाची वेळ तुमच्यावर येणार नाही. तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्ही आतातरी मराठ्यांचा द्वेष सोडून द्या. मराठ्यांचं वाटोळं होईल, असं छगन भुजबळ सांगतात. तुम्ही त्यांचं ऐकू नका. तुम्ही सर्वात जास्त छगन भुजबळचं ऐकलं. छगन भुजबळला तुम्ही ताकद दिली. तुम्ही छगन भुजबळला ओबसीचे नेते गोळा करायला लावले आहेत. फणडवीस साहेब तुम्ही हे कसं नाकारता. मी तुम्हाला हात जोडून विनंती केली आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maratha Reservation: 'मराठ्यांनी उभा देश चालवायचा, आरक्षणाचं कुठून काढलं?', संभाजी भिडेंचा यू-टर्न

आमच्या मुलांचे अॅडमीशन होते त्यावेळी तुम्ही लाडकी बहीण आणली. आमचा लाडक्या बहीणीला विरोध नाही. तुम्ही फक्त छगन भुजबळांचं ऐकून घेत आहेत. ओबीसींची बाजू ऐकून घ्यायची आणि मराठ्यांची ऐकून घ्यायची नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर तुम्हाला पश्चातापाची वेळ आयुष्यात येणार नाही. राजीनामे द्यायचे आणि सन्यास घ्यायचे, असला पच्छाताप येणार नाही. तुम्ही जाणून बुजून आमच्या पोरांच्या मागे लागला आहात. तुम्ही भुजबळचा ऐकून घेता आणि आमचं ऐकूनच घेत नाही. ही कोणती पद्धत आहे? शिंदे समितीला तुम्ही वाढ दिली. शिंदे समिती काम का करत नाही? शिंदे समितीनं पूर्ण राज्याचा शिक्षण विभागाचा रेकॉर्ड तपासला का? देव देवतांची सर्व संस्थाने तुम्ही तपासले का? तुमही जन्म मृत्यूचे दाखले का तपासले नाहीत? असे सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केले आहेत. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT