गुलाल उधळला? मग पुन्हा आंदोलन का सुरू झालं? थोरातांचा सरकारला सवाल
मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा नवी मुंबईत आला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली होती. त्यावेळी गुलाल उधळला होता, तुम्ही मिठ्या मारल्या होत्या, कानात बोलला होता, तरीही आता हे आंदोलन का चिघळलं आहे असा सवाल काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गुलाल उधळूनही मराठा आंदोलन का चिघळलं
मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही आंदोलन पुन्हा का सुरू झालं?
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारल्यापासून मराठा आरक्षण अनेक मुद्यांनी चर्चेला आले आहे. त्यानंतरही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन सुरू ठेवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी सागर बंगल्याकडे येणार असल्याचा इशारा दिला.
ADVERTISEMENT
आंदोलन पुन्हा का?
त्यानंतर आज विधानसभेतून फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर विरोधी पक्षातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक सरकारला अनेक सवाल उपस्थित करत हे मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतरही हे आंदोलन पुन्हा का सुरु झालं असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
तुमची चर्चा काय ?
आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारला मराठा आरक्षणावरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. या आधीही मराठा आंदोलनं झाली, लाखोंच्या सभा झाल्या आणि ती शांततेतही पार पडली. त्यानंतर त्यांनी मराठा मोर्चा मुंबईकडे वळवला. त्यावेळी मुख्यमंत्री नवी मुंबईत जाऊन मध्यस्थी केली. मात्र ती चर्चा काय झाली, त्यांची बोलणी काय झाली याबाबत कोणीच काही सांगितली नाही.
हे वाचलं का?
टीकेचं समर्थन नको
मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी गुलाल उधळला गेला, जल्लोष झाला, तरीही आंदोलन का झालं असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी सरकारला उपस्थित केला आहे. मात्र त्यानंतर त्यांनी केलेल्या टीकेचं मी समर्थन आम्ही करणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
'तुम्ही मिठ्या मारता...'
बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'तुम्ही मिठ्या मारता, कानात बोलता आम्ही विरोधी बाकावर बसलो असलो तरी आम्ही महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे ही अपेक्षा आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राची राखरांगोळी नको
मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली होती, गुलाल उधळला होता, तरीही या आंदोलनाची तीव्रता का वाढली हेह तपासले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. थोरातांनी या महाराष्ट्राची जाळपोळ आणि राखरांगोळी झालेली पाहण्याकरिता आम्ही नाही तर हा महाराष्ट्र बंधूभावानं आणि शांततेनं राहिला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
Manoj Jarange : जरांगेंची एसआयटी चौकशी करणार; फडणवीसांनी विधानसभेत काय सांगितलं?
हे ही वाचा >>
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT