Manoj Jarange : 'मुख्यमंत्री साहेब..यांचा माज उतरवायला आम्हाला...', वाल्मिक कराड समर्थकांना मनोज जरांगेंचा इशारा

मुंबई तक

Manoj Jarange On Walmik Karad And Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ADVERTISEMENT

Manoj Jarange On Walmik Karad And Dhananjay Munde
Manoj Jarange On Walmik Karad And Dhananjay Munde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी

point

"धनंजय मुंडेंना राज्यात कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची नाही, त्यांच्यामुळे..."

point

मनोज जरांगे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

Manoj Jarange On Walmik Karad And Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्यानंतर कराड समर्थकांनी न्यायालयाबाहेर मोठा राडा केला. न्या द्या..न्याय द्या..वाल्मिक कराडला न्याय द्या, अशी मागणी कराड समर्थकांकडून करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत वाल्मिक कराड, मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थंकावर जोरदार हल्लाबोल केला. "मुख्यमंत्री साहेब थांबवा हे..लोकांना गोर-गरिब जनतेला त्रास होता कामा नये. यांची टोळी माजोरडी आहे. यांचा माज उतरवायला आम्हाला टाईम लागणार नाही", असा इशाराच जरांगेंनी दिला आहे.

मनोज जरांगे पत्रकार परिषदेत म्हणाले, "धनंजय मुंडेंना राज्यात कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची नाही. त्यांच्यामुळे या सर्वांना एवढा माज आलाय. मुख्यमंत्री साहेब थांबवा हे..लोकांना गोर-गरिब जनतेला त्रास होता कामा नये. यांची टोळी माजोरडी आहे. यांचा माज उतरवायला आम्हाला टाईम लागणार नाही. कोर्टात जाऊन जर धिंगाणा घालत असतील, तर आता कुठे गेली संचारबंदी? 144 लागू केलेलं कुठं गेलं? आरोपीला हे साथ कसं काय देऊ शकतात? असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला आहे".

हे ही वाचा >> Walmik Karad : वाल्मिक कराडला 7 दिवसांची SIT कोठडी, पाय आणखी खोलात जाणार? कोर्टात काय घडलं?

पंतप्रधान मुंबईत असताना, धनंजय मुंडे आज परळीत गेलेत, मुद्दाम मुंडेंना मोदींच्या दौऱ्यापासून दूर ठेवलं असं वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना जरांगे म्हणाले, दादागिरी, गंडुगिरीच्या टोळ्या, जातीय तेढ निर्माण करतात..यांना सामाजिक सलोखा ठेवायची नाही. जिल्ह्याची शांतता भंग करायची आहे. हे असले काय कामाचे..खुनातील, खंडणीती आरोपी आणि त्याला पाठबळ देतेय धनंजय मुंडेची टोळी..सोडून देण्यासाठी आंदोलन करत आहेत. फडणवीस सरकारला डाग लावायचं काम करत आहेत. 

हे ही वाचा >> Walmik Karad: वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाबाहेर तुफान राडा, नेमकं काय घडलं?

याचासुद्धा खुनात हात आहे का? यावर सुद्धा शंका येत आहे. धनंजय मुंडेची गुंडाची टोळी थांबवा. जर हे आरोपीच्या बाजूनं आरडाओरडा करायला लागले आणि गोर गरिबांना त्रास झाला, तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही. फडणवीस साहेब आणि अजितदादा जर धनंजय मुंडे टोळ्या चालवणार असला आणि टोळीच्या नावावर त्यांची जातसुद्धा बदनाम करत असला, तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp