Maratha Reservation: अजित पवारांवर मोठी नामुष्की, चक्क बारामतीचा दौरा रद्द; काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

maratha reservation village ban big ignominy on dcm ajit pawar baramati tour had to be cancelled maratha morcha
maratha reservation village ban big ignominy on dcm ajit pawar baramati tour had to be cancelled maratha morcha
social share
google news

Maratha Reservation Ajit Pawar Baramati villege ban: वसंत मोरे, बारामती: बारामती (Baramatia) तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी येऊ नये यासाठी सकल मराठा समाजाचा वाढता विरोध लक्षात घेऊन अजित पवार यांच्यावर चक्क बारामती दौरा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. बारामती पोलीस स्टेशनच्या वतीने या माहितीला दुजोराही देण्यात आला आहे. (maratha reservation village ban big ignominy on dcm ajit pawar baramati tour had to be cancelled maratha morcha)

ADVERTISEMENT

मराठा समाजाच्या आंदोलनाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातल्या अनेक गावात राजकीय नेते मंडळींना प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बारामतीमधल्या नियोजित कार्यक्रमाला येण्यास मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मज्जाव केला. त्याला प्रतिसाद देत अजित पवार यांनी बारामती दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘…याला संपवायला पाहिजे होता’, सदावर्तेंबद्दल शिंदे गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता. मात्र, या कार्यक्रमाला अजितदादांनी येऊ नये असं आवाहन मराठा समाजाच्या बांधवांनी केले होते. यासंदर्भात काल पोलीस प्रशासन आणि मराठा आंदोलकांमध्ये समन्वय बैठक घेण्यात आली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्याने आज कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुपारी एक वाजेच्या सुमारास या कार्यक्रमासाठी अजित पवार येणार होते. तशी माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आळी होती. पण मराठा आंदोलकांचा विरोध लक्षात घेऊन अजित पवारांनी आपला हा दौराच रद्द केला. कोणत्याही परिस्थितीत अजितदादांना गव्हाणीत मोळी टाकू दिली जाणार नाही. अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती.

केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या नांदेड दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यभर राजकीय नेत्यांना गावबंदी, शहरबंदीचा निर्णय सकल मराठा आंदोलकांकडून राज्यभर सुरू असताना आज नांदेडमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या नांदेड दौऱ्याला मराठा आंदोलकाकडून विरोध करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘उपोषणादरम्यान जीवाला धोका निर्माण झाल्यास…’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मंत्री भागवत कराड हे एका रोजगार मेळाव्यानिमित्त नांदेड शहरात आले होते. पण त्यांचे आगमन होताच मराठा आंदोलकांकडून कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम बंद पाडण्यासाठी मराठा आंदोलकांनी रेल्वे डिव्हिजन ऑफिससमोर काळे झेंडे दाखवत मंत्री कराड यांचा निषेध केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT