Maharashtra Vidhan Sabha : अजित पवारांच्या जागेवर भाजपचा दावा, मावळमध्ये नवा तिढा
Maval vidhan sabha constituency : महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतदारसंघावरून आता नवा संघर्ष सुरू झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या मावळ मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मावळ विधानसभा निवडणूक २०२४
भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेवर दावा
भाजपचे बाळा भेगडे काय म्हणाले?
Maharashtra Assembly Election 2024 : (कृष्णा पांचाळ, पुणे) सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. महायुतीतील मित्रपक्षांनीही विधानसभेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे, पण स्थानिक पातळीवर मतदारसंघावरून संघर्ष होताना दिसत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघावर आता भाजपने दावा केला आहे. (bjp claims on ncp's Maval assembly constituency)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीवेळी जागावाटपाला विलंब झाल्याचा फटका महायुतीला बसला. त्यामुळे विधानसभेला ही चूक टाळण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे.
हेही वाचा >> अजित पवार-अमित शाहांची मध्यरात्री बैठक, हव्यात 'इतक्या' जागा?
विधानसभा निवडणुकीचे जागावाटप लवकर व्हावे, यासाठी महायुतीतील मित्रपक्षांची चर्चाही सुरू आहे. पण, त्याआधीच आता महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांकडून वेगवेगळ्या मतदारसंघावर दावे केले जात आहे. आता भाजपने अजित पवारांच्या मतदारसंघावर दावा केला आहे.
हे वाचलं का?
भाजपला मावळ विधानसभा मतदारसंघ
मावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, असा प्रश्न जेव्हा माजी मंत्री आणि भाजपचे नेते बाळा भेगडे यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, "मावळ तालुक्याचा संपूर्ण इतिहास जर पाहिला, तर रामभाऊ म्हाळगी यांनी जनसंघाच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व केले आहे. 1957 ते 2024 या काळात सर्वाधिक वेळा जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना या तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे."
हेही वाचा >> "शरद पवारांनी या गोष्टीला हातभार लावू नये", ठाकरेंचा टोला
बाळा भेगडे काय म्हणाले?
"संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा म्हणून मावळची महाराष्ट्रात ओळख आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ तालुका... ही जागा भाजपला मिळावी म्हणून आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत. महायुतीमध्येही जागा भाजपला मिळावी. ही आमची पहिली आग्रहाची मागणी आणि कमळ हा आमचा चेहरा असणार आहे", असे बाळा भेगडे म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "राष्ट्रवादीकडून पाठीत वार करण्याचे काम सुरू", महायुतीत संघर्ष
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हव्यात 80-90 जागा
महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ८० ते ९० जागांची मागणी केली जात आहे. २०१९ मध्ये ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्याशिवाय आणखी जागा वाढवून हव्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT