मकोका लागला अन् वाल्मिक कराडचे दिवस फिरले, 'तो' फ्लॅटच केला सील!
वाल्मिक कराड याच्याविरोधात मकोका लावण्यात आल्यानंतर आता त्याचा पिंपरी-चिंचवडमधील एक फ्लॅट हा सील करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वाल्मिक कराडच्या संपत्तीवर आली टाच

वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट केला सील

मिळकत कर थकवल्याने महापालिकेकडून कारवाई
Walmik Karad Flat: कृष्णा पांचाळ, पिंपरी-चिंचवड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर आता झटपट कारवाईचा बडगा सरकारकडून उगारला जात आहे. काल (14 जानेवारी) वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. ज्यानंतर आज त्याला कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याचदरम्यान, आता वाल्मिक कराडविरोधात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. (mcoca was enacted and the government took action against walmik karad sealing his flat in pimpri chinchwad)
वाल्मिक कराडचा फ्लॅट केला सील
वाल्मिक कराडचे एक-एक गुन्हे समोर येत असतानाच दुसरीकडे आता त्याच्या प्रॉपटीवर टाच आणण्यास सुरुवात झाली आहे. वाल्मिकची कोट्यवधीची बेनामी संपत्ती असल्याचा आरोप हा विरोधकांकडून करण्यात येत असताना आता त्याचा पिंपरी-चिंचवडमधील एक फ्लॅट हा सील करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Walmik Karad: '...यासाठी वाल्मिकने संतोष देशमुखांची केली हत्या', SIT ने थेट कोर्टातच...
पिंपरी-चिंचवडमधील पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीमध्ये वाल्मिक कराडचा एक फ्लॅट आहे. जो आता सील केला जाणार आहे. त्यानंतर त्याचा लिलावही केला जाईल. 16 जून 2021ला वाल्मिक कराड आणि पत्नी मंजिली कराडच्या नावे या फ्लॅटची नोंदणी झाली आहे. मात्र, तेव्हापासून वाल्मिक कराडने मिळकत कर थकवला आहे.
1 लाख 55 हजार 444 रुपयांचा हा मिळकत कर थकवल्याप्रकरणी पालिकेने वाल्मिक कराडला नोटीस ही धाडली आहे. 21 नोव्हेंबर 2024ला धाडलेल्या नोटिशीनंतर देखील कर न भरल्यानं आता हा फ्लॅट सील केला जाणार आहे आणि त्यानंतर त्याचा लिलावही करण्यात येईल. याबाबत कर संकलन विभागाचे प्रमुख अविनाश शिंदे यांनी माहिती दिली आहे.
हे ही वाचा>> Manoj Jarange : 'मुख्यमंत्री साहेब..यांचा माज उतरवायला आम्हाला...', वाल्मिक कराड समर्थकांना मनोज जरांगेंचा इशारा
वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक फ्लॅट
वाल्मिक कराडचा आलिशान फ्लॅट सील करण्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड पालिकडेकडून सुरु आहे. असं असतानाच वाल्मिक कराडचा आणखी एक फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. हा फ्लॅट पत्नी मंजिली वाल्मिक कराड यांच्या नावावर आहे. पिंक सिटी रोडवरील कासा बेला सोसायटीतील 403 नंबरचा हा फ्लॅट आहे. या फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे.
1 एप्रिल 2016 पासून हा फ्लॅट मंजिली यांच्या नावे असल्याची नोंद पिंपरी पालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. आजच्या बाजारभवानुसार हा फ्लॅट एक कोटींचा आहे.