MLA Disqualification: कोणाच्या मनातही नसेल असा निकाल देणार नार्वेकर.., मोदी-शाहांसारखं वापरणार धक्कातंत्र?
Rahul Narwekar: शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल सुनावणार आहेत. त्यावेळी ते काही धक्कातंत्राचा वापर करू शकतात अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ADVERTISEMENT
Rahul Narwekar verdict on mla disqualification: मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification) या बहुप्रतिक्षित याचिकेवर अखेर आज (10 जानेवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपला निकाल सुनावणार आहेत. शिवसेनेतील बंडानंतर ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ज्यावर निकाल देताना कोर्टाने शिंदेंचं सरकार कायम ठेवलं होतं. पण त्याचवेळी आमदार अपात्रातेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांकडे टोलवला होता. याच याचिकेवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे निर्णय सुनावणार आहेत. पण त्यांचा हाच निर्णय धक्कातंत्र देणार असेल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (mla disqualification case rahul narwekar will give verdict that no one will have in mind will he use shock tactics like modi shah)
ADVERTISEMENT
शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्यासह 16 आमदारांविरोधात अपात्रता याचिका ही दाखल करण्यात आली होती. पण त्यावर कोर्टाने काहीही निकाल न देता त्याबाबत विधानसभा अध्यक्षांना सुनावणी घेण्यास सांगितलं. ठाकरेंचं सरकार पडल्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दिलेल्या निकालात शिंदेंचं सरकार हे कायम ठेवलं होतं. पण शिंदेंनी व्हीप म्हणून भरत गोगावले यांची जी नियुक्ती केली होती ती त्यांनी अवैध ठरवली होती. याच मुद्द्यावर राहुल नार्वेकर यांना प्रामुख्याने निकाल द्यायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे अनेक समर्थक हे निकाल आपल्याच बाजूने लागेल असं ठामपणे सांगत आहेत. मात्र, असं असलं तरीही राहुल नार्वेकर हे निकालात काही धक्कातंत्र वापरणार कशी कुजबूज देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपचं धक्कातंत्राचं राजकारण..
खरं तर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून संबंधित याचिकेवर निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. मात्र, ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे शिर्षस्थ नेते म्हणजेच मोदी-शाह यांचा धक्कातंत्राचा इतिहास मागील 9 वर्षांपासून संपूर्ण देश पाहत आला आहे. आजवर मोदी-शाह यांनी वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या धक्कातंत्राने भल्याभल्यांचे अंदाज चुकवले आहेत. पण प्रामुख्याने महाराष्ट्रात त्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीचे राजकीय निर्णय घेऊन राजकीय पंडितांना देखील बुचकाळ्यात टाकलंय.. ते पाहता आज देखील अनपेक्षित अशी घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचलं का?
जर मोदी-शाह यांच्या प्रमाणेच राहुल नार्वेकरांनी देखील धक्कातंत्राचा वापर करायचं ठरवल्यास तर या संपूर्ण घटनेचं चित्रच बदलून जाण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांचं ‘ते’ विधान अन् भाजपचं सर्वात मोठं धक्कातंत्र…
पंतप्रधान मोदी हे स्वत:चं मंत्रिमंडळ असो किंवा कोणत्याही राज्यातील राजकीय निर्णय असो.. त्यात अनेकदा धक्कातंत्राचा वापर करतात.. साधारण दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्राबाबतही मोदी-शाह यांनी सर्वांनाच धक्का देणारा निर्णय घेतला होता.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंनी बहुसंख्य आमदारांनासोबत घेऊन शिवसेनेत बंड केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली होती की, ते आता भाजपच्या साथीने राज्यात पक्ष स्थापन करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये एकच जल्लोष झाला होता.. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा विराजमान होणार अशी जोरदार चर्चा होती किंबहुना सर्वांना खात्रीच होती की, फडणवीसच मुख्यमंत्री होणार तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार. अगदी आदल्या रात्रीपर्यंत फडणवीसांच्या गोटात त्यावरून आनंद व्यक्त केला जात होता.
ADVERTISEMENT
मात्र, मोदी-शाह यांच्या मनात काहीतर वेगळंच होतं.. मात्र, त्याच्या आधी म्हणजे उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याच्या दिवशी सकाळीच माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी एक विधान केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी खरं तर एकनाथ शिंदेंवर टीकाच केली होती. त्यावेळी राऊत म्हणाले होते की, ‘शिंदेंनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे. पण हे करून देखील त्यांना काय मिळणार आहे? तर उपमुख्यमंत्री पदच ना.. भाजप त्यांना करणार आहे का मुख्यमंत्री?’ असं म्हणत राऊतांनी खरं तर शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पण हीच गोष्ट अवघ्या काही तासात खरी ठरली होती.
हे ही वाचा>> MLA Disqualification : निकालाआधी शेलारांनी ठाकरेंना डिवचलं, ‘मर्द म्हणायचं आणि…’
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद खऱ्या अर्थाने स्फोटक ठरली होती. कारण कोणाच्याही मनीध्यानी नसणारी गोष्ट त्यात घडली होती. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्री होणार नसून त्या खुर्चीत एकनाथ शिंदे बसणार असल्याची घोषणा केली होती. हाच होता मोदी-शाह यांचा मास्टरस्ट्रोक…
ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता.. भाजप आतापर्यंत कधीही अपेक्षित असे निर्णय घेत नाही.. हे दिसून आलं. आता हीच परंपरा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील पाळणार का? हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे..
ठाकरे गटाच्या निशाण्यावर राहुल नार्वेकरच..
आतापर्यंत शिवसेना (UBT) ने राहुल नार्वेकरांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते पक्षपातीपणा करत असल्याचे आरोप ठाकरे गटाने केले आहेत. एवढंच नव्हे तर निकालाला दोन दिवस बाकी असताना नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची जी भेट घेतली होती. त्यावरून कठोर शब्दात उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केलेली. आता या सगळ्याचा निकालावर नेमका परिणाम काय होणार हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे.
हे ही वाचा>> Mla Disqualification : ‘अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे’; CM शिंदे स्पष्टच बोलले
‘राहुल नार्वेकर याचिकाच फेटाळू शकतात..’
“१०व्या परिशिष्टाकरिता जी अपात्रतेची नोटीस दिली जाते, त्यामध्ये कोणती कारणे विशद केलेली आहे. आणि जो व्हीप काढलेला आहे, त्यामध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे का, हे देखील अध्यक्षांना बघावं लागेल. माझ्यामते काही याचिका तांत्रिक कारणामुळे अध्यक्ष फेटाळू शकतात. काही याचिका मंजूर करू शकतात. कोणत्या फेटाळतील आणि कोणत्या मंजूर करतील, हे आज जरी सांगता येणार नसलं, तरी जिथे तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नाही, असे सबळ कारण देऊन अध्यक्ष ती याचिका फेटाळू शकतात.” असं मत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे. त्यामुळे तशाही स्वरुपाचा एक निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT