चिन्ह मिळाल्यानंतर आव्हाडांनी रणशिंगच फुंकले, 'वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी'

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jitendra Awhad
Jitendra Awhad
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी'

point

'तुतारी'मुळं युद्धाचे संकेत मिळाले

NCP Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण अनेक मुद्यांनी ढवळून निघाले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला चिन्ह मिळाले आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि घड्याळ हे चिन्ह गेल्यानंतर शरद पवार गटाला काय चिन्ह मिळणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळे आता हे चिन्ह मिळाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी असं म्हणत अजित पवार गटाला थेट इशारा दिला आहे. 
हे चिन्ह मिळाल्याने युद्धाचेच संकेत मिळाले असून त्यासाठी आम्ही आणि महाराष्ट्र आता सज्ज असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. 

ADVERTISEMENT

या वयातही लढाई

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना थेट विरोधकांना इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांविषयी गौरवौद्गगार काढत ते या वयातही आता लढाई करायला सज्ज असल्याचे ठणकावून सांगितले आहे. 

ही धर्माची लढाई 

'वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी' म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला इशारा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, आता आम्हीच नाही तर ही धर्माची लढाई लढण्यासाठी शरद पवार सज्ज असून महाराष्ट्रही लढण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

84 वर्षाच्या म्हातारा 

चिन्ह मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'एका योद्ध्याला शोभेल अशी ही निशाणी दिली आहे.
84 वर्षाच्या म्हातारा हो मी त्यांना म्हातारच म्हणेन. आज युद्धासाठी उभा राहिला आहे. पण संकेत काय मिळाले. चला युद्धाला उभा राहा.

राजकारणातील भीष्माचार्य 

'वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी' तुतारी वाजलेली आहे. बिगुल वाजलेलं आहे आणि महाराष्ट्र आता युद्धासाठी तयार आहे. हा नैसर्गिक संकेत आहे. शरद पवार युद्धाल उभे आहेत. या महाराष्ट्राच्या भूमीतील राजकारणातील भीष्माचार्य आता धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal: 'शरद पवार म्हणजे घड्याळ, तुतारी हे...'

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT