'मी म्हटलं, मी संपलो...', राज ठाकरेंनी सांगितला कॉलेजमधील 'त्या' मुलीचा भन्नाट किस्सा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Raj Thackeray latest Interview
Raj Thackeray College Life
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंनी कॉलेजच्या आठवणींना दिला उजाळा

Raj Thackeray latest Interview : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजकारणाच्या बाहेरील जीवनाची तुफान चर्चा रंगली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेमकं झालंय तरी काय? खरंतर राज ठाकरे यांनी युट्यूबवर एका शोमध्ये मुलाखत देताना त्यांच्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. 

राज ठाकरेंनी सांगितला 'त्या' मुलीचा भन्नाट किस्सा

कॉलेजच्या आठवणी ताज्या करत राज ठाकरे मुलाखतीत म्हणाले, "माझी कॉलेजमधील एक सर्वात भीतीदायक आठवण आहे. बालमोहन विद्यामंदिरमधून मी डायरेक्ट जे जे स्कूल ऑफ आर्टला गेलो. एकदम हायफाय लेव्हलची, कशाप्रकारची लोकं तिकडे येतात, हे सर्व ऐकून निघून गेलो होतो. त्यावेळी एंटरन्स एक्झाम दिली आणि कॅन्टिनमध्ये येऊन कॉफी घेतली.

इतक्यात एक समोरून मुलगी आली. शॉर्ट्स आणि व्हाईट शर्ट घातलेलं होतं. हातात कॉफी..तोंडात सिगारेट घेत बाहेर आली. मी म्हटलं, मी संपलो..आता काहीच होऊ शकत नाही. त्यानंतर मला कळलं तिथे 95 टक्के सर्व मराठीच आहेत. आमच्यावेळी फर्स्ट आणि सेकंड ईयरला इंग्लिशपण मराठीत शिकवायचे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Amit Thackeray : भोंग्याचा मुद्दा राज ठाकरेंनी महायुतीच्या काळात का लावून धरला नाही? अमित ठाकरे म्हणाले तुम्ही...

माझ्या आयुष्यात मी कधीही निवडणूक लढवली नाही. कॉलेजमध्ये एकदाच लढवली होती. ती निवडणूक होती क्लास रिप्रेजेंटेटिव्हची. स्कूल ऑफ आर्टला आमचे दोन वर्ग असायचे. आमच्याकडे कुणीही जिंकलं तरी, पार्टी कॉमन असायची. शिवाजी पार्कच्या आठवणींवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, सर्वच शिवाजी पार्कमध्ये होतं. क्रिकेट सर्व इथेच असायचं. आचरेकर सर, सचिनचं पिच असायचं. लहानपणी मी इथेच खेळलो. मी दोन वर्ष अण्णांकडे होतो. दादर, माहिम, शिवाजी पार्कमध्ये राहणाऱ्या माणसाला वसईचा भजी पाव माहित नाही, असं होऊच शकत नाही. मी किर्ती कॉलेजचा वडापाव खूप उशिरा खाल्ला."

हे ही वाचा >> Sharad Pawar : परळीतून शरद पवारांची मोठी खेळी, धनंजय मुंडेंविरोधात मराठा कार्ड; कोण आहे उमेदवार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT