MOTN: मुख्यमंत्री शिंदेंचा कारभार कसा?, किती टक्के जनता समाधानी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिंदेंचा कारभार कसा?, किती टक्के जनता समाधानी?
मुख्यमंत्री शिंदेंचा कारभार कसा?, किती टक्के जनता समाधानी?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मूड ऑफ द नेशन सर्व्हे, कसा आहे जनतेचा मूड

point

शिंदें सरकारच्या कारभाराबाबत जनतेला काय वाटतं?

point

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामगिरीवर किती टक्के जनता समाधानी?

CM Eknath Shinde: मुंबई: केंद्रात मोदी सरकार येऊन आता तीन महिने पार पडले आहेत. असं असताना देशातील जनतेचा नेमका मूड कसा आहे हे जाणून घेण्यासाठी इंडिया टुडेने केलेल्या मूड ऑफ द नेशन या सर्व्हेत अनेक नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यामधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीसाठी चिंता वाढू शकते. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामगिरी कशी आहे आणि त्याबाबत जनतेला नेमकं काय वाटतं हेही या सर्व्हेत जाणून घेतलं आहे. (mood of the nation 2024 how is chief minister eknath shinde administration what percentage of people are satisfied)

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील जनतेला शिंदे सरकारची कामगिरी वाटते?

शिंदे सरकारच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचं दिसून येत आहे. सर्व्हेनुसार 25 टक्के लोकं हे शिंदे सरकारच्या कामावर खूप समाधानी आहेत. तर 34.45 टक्के हे समाधानी असल्याचं पाहायला मिळत आहे.

तर 33.55 टक्के लोकं हे शिंदे सरकारच्या कामगिरीवर असमाधानी आहेत. तर 6.99 टक्के लोकांनी सांगता येत नाही असं मतं दिलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामगिरीवर किती समाधानी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यामधील नेते असल्याचं त्यांच्या एकूण कारभारावरून महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळतंय. तेच सर्व्हेमधून देखील प्रतिबिंबीत होत आहे. कारण मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामगिरीवर तब्बल 34.87 टक्के लोकांनी खूप समाधानी असल्याचं सर्व्हेत म्हटलं आहे. तर 31.12 टक्के लोकांनी कामगिरीवर समाधानी असल्याचं म्हटलं आहे.

तर 27.07 टक्के लोकांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या कामगिरीवर असमाधानी असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर 6.31 टक्के लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं आहे. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते?

या सर्वेक्षणातून असेही समोर आले आहे की, महाराष्ट्रातील लोकांसाठी सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे. ज्याला 32% लोकांनी प्राधान्य दिले आहे. यानंतर 15% लोकांसाठी विकास आणि महागाई हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आहेत. शेतकऱ्यांशी संबंधित समस्यांना 13% लोकांनी प्राधान्य दिले आहे, तर कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांकडे अनुक्रमे 2% आणि 4% लोकांनी लक्ष वेधलं आहे. यावरून हे स्पष्ट होते की, रोजगाराचा अभाव ही राज्यातील जनतेची सर्वात मोठी चिंता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT