ठाकरेंची 'या' निवडणुकीत बाजी, भाजपला दिला धोबीपछाड

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

mumbai university senate election result 2024 udhhav thackeray shiv sena ubt yuvasena won 10 out of 5 seat abvp vs yuvasena
ठाकरेंच्या युवासेनेची सिनेट निवडणुकीत 5 जागा जिंकल्या
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंच्या युवासेना सिनेट निवडणुकीत

point

युवासेनेने राखीव प्रवर्गातील पाच जागा जिंकल्या

point

या निवडणुकीत युवासेना विरूद्ध एबीवीपी यांच्यात थेट लढत होती

Mumbai Senate Election Result Update : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या युवासेनेने मुसंडी मारली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानूसार युवासेनेच्या 7 उमेदवारांचा विजय झाला आहे.ठाकरेंच्या युवासेनेला मिळालेल्या या विजयामुळे अभाविपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान अजुन निवडूणुकीची मतमोजणी सूरू असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल. 

राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर ठाकरेंच्या युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.इतर मागासवर्गीयमध्ये युवासेनेचे मयूर पांचाळ, महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी, अनुसूचित जाती प्रवर्गातून शितल देवरूखकर, अनुसुचित जमाती प्रवर्गातून डॉ. धनराज कोहचाडे, व्हिजेएनटी प्रवर्गातून शशिकांत झोरे हे उमेदवार विजयी ठरले आहे.(mumbai university senate election result 2024 udhhav thackeray shiv sena ubt yuvasena won 10 out of 5 seat abvp vs yuvasena)

युवा सेना ठाकरे गटाच्या शीतल देवरुखकर यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून (SC) 5498 मतं खेचून आणली. तर त्यांच्याविरोधातील उमेदवार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राजेंद्र सायगावकर यांना 1014 मते पडली. देवरुखकर यांनी एबीव्हीपीवर मात करत विजयाचा झेंडा फडकवला. तर अनुसूचित जमाती प्रवर्गात (ST) युवासेना धनराज कोहचाडे यांना 5247 मते मिळाली. तर ABVP च्या उमेदवार निशा सावरा  918 यांना मतदान खेचण्यात यश आले नाही. त्यांना हजाराचा टप्पा गाठता आला नाही. युवासेनेचे मयूर पांचाळ आणि स्नेहा गवळी यांनी पण विजयाचा फेटा डोईवर बांधला आहे. धनराज कोहवाडे आणि शशिकांत झोरेही विजयी झाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: 4500 खात्यात आलेच नाही...आता पुढे काय करायचं?

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक 2024 निकाल
युवासेनेचे राखीव गटातील विजयी उमेदवार

1)स्नेहा गवळी-महिला राखीव
2)शीतल देवरुखकर-शेठ-अनुसूचित जाती
3)धनराज कोहचाडे-अनुसूचित जमाती-
4)शशिकांत झारे-विज-भज(DT-NT)
5)मयुर पांचाळ-इतर मागसवर्ग

मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदाधिकाऱ्यांच्या जागाकरीता मंगळवारी 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडले होते. सध्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होत आहे. 

ADVERTISEMENT

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी युवासेना आणि अभाविपने सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर छात्रभारतीने चार, मनसेने एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून एकही उमेदवारी सिनेटच्या निवडणुकीत उतरवण्यात आलेला नाही. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड, मंत्रालयात तुफान राडा करणारी ती महिला कोण?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT