धनंजय मुंडेंवरचा 'तो' प्रश्न अन् नामदेव शास्त्री मुंबई Tak च्या LIVE शोमधून उठून गेले!

अनुजा धाक्रस

Namdev Shastri: मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत काही प्रश्न विचारल्यानंतर त्यावर उत्तरं देण्याऐवजी नामदेवशास्त्री हे मुंबई Tak च्या Live शोमधून उठून गेले. त्यांच्या या कृतीबाबत आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

ADVERTISEMENT

धनंजय मुंडेंवरील प्रश्न विचारल्याने नामदेव शास्त्री चिडले
धनंजय मुंडेंवरील प्रश्न विचारल्याने नामदेव शास्त्री चिडले
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धनंजय मुंडेंना नामदेव शास्त्रींनी दिलाय भक्कम पाठिंबा

point

धनंजय मुंडेंवरील प्रश्न विचारल्याने नामदेव शास्त्री चिडले

point

मुंबई Tak चा LIVE शो सोडून निघून गेले

Namdev Shastri Mumbai Tak Video: बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असणारे आरोपी हे मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याने तसेच त्यांचे काही आर्थिक हितसंबंध असल्याचे दावे केले जात असल्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात आहे. अशातच त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांची भेट घेतली. त्यानंतर नामदेवशास्त्रींनी मीडियासमोर येऊन धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा जाहीर केला. पण याच सगळ्या मुद्यावर मुंबई Tak सोबतच्या मुलाखतीत जेव्हा नामदेवशास्त्रींना प्रश्न विचारले गेले तेव्हा ते त्यांनी त्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी LIVE मुलाखत अर्धवट सोडून जाणं पसंत केलं. 

'तो' प्रश्न अन् नामदेव शास्त्री LIVE मुलाखत सोडून गेले.. 

प्रश्न: जेव्हा धनंजय मुंडेंवर आरोप होतात की, ते काही आरोपींना राजाश्रय देतात.. त्यांचा वरदहस्त होता. त्या धनंजय मुंडेंना जेव्हा तुमचा पाठिंबा येतो.. 

नामदेवशास्त्री: आपण धनंजय मुंडेंना निर्दोष मानता हे पुष्कळ आहे. मी राजकीय नाहीए. मला इतर विषयी प्रश्न विचारू नका. धनंजय, धनंजयची आई..

हे ही वाचा>> Manoj Jarange : "वारकरी संप्रदाय काय गुंड चालवतात का?" नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचा सवाल

प्रश्न: ज्या धनंजय मुंडेंवर आरोपीचा वरदहस्त असल्याचा आरोप होतो. त्या धनंजय मुंडेंना तुम्ही पाठिंबा देत आहात का? 

नामदेवशास्त्री: ज्या दिवशी धनंजय दोषी होईल त्यादिवशी मी न सांगता शासन, मुख्यमंत्री हे सगळे शिक्षा करतील ना. हा तुमचा आणि माझा विषय नाही ना. आज दोषी नाही हा महत्त्वाचा विषय. जेव्हा धनंजय दोषी ठरेल तेव्हा राजीनामा घेतील ना. 

प्रश्न: धनंजय मुंडेंवर एक आरोप होतोय तो पीक विमा घोटाळ्याचा, दुसरा आरोप होतो तो ऑफिस ऑफ प्रॉफिटचा.. 

नामदेवशास्त्री: मला काहीच देणंघेणं नाहीए... तो हत्यारा नाही..

हे ही वाचा>> Namdeo Shastri : धनंजय मुंडे यांच्यावर मीडिया ट्रायल, भगवानगड त्यांच्या पाठीशी : महंत नामदेव शास्त्री

प्रश्न: पण तुम्ही त्याला पाठिंबा देताय ना? 

नामदेवशास्त्री: हत्यारा नाहीए म्हणून पाठिंबा आहे. त्यांच्या जीवनात अजून काय-काय घडलंय त्याचं पुराण माझ्यासमोर काढू नका. तो न्यायालयाचा विषय आहे. पीकविमा घोटाळा असेल किंवा अजून काही असेल. हे राजकारण नका सांगू. एक भक्त भेटायला आला त्याला आशीर्वाद दिला. याचं राजकारण काय करता तुम्ही? धन्यवाद.. आपल्यासोबत इतकंच बोलतो.. 

एवढंच बोलून नामदेवशास्त्री यांनी मुंबई Tak ची LIVE मुलाखत सोडून दिली. यावेळी त्यांनी कोणतेही पुढचे प्रश्न ऐकूनच घेतले नाही. 

धनंजय मुंडेंवर सर्वपक्षीय नेते हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करत आहेत. अशावेळी समाजावर आध्यात्मिक मार्गाने पकड असणाऱ्या नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंची केलेली पाठराखण यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर त्याच धनंजय मुंडेंबाबत प्रश्न विचारल्याने चिडून ते मुलाखतच सोडून जाणं हे नेमकं कशाचं द्योतक आहे? असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp