Ajit Pawar Candidates List : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत कोणत्या लाडक्या बहिणींना संधी?
Ajit Pawar Candidates First List : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अजित दादा गटाने कोणत्या लाडक्या बहिणींना दिली संधी?
राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी
Ajit Pawar Candidates First List : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. तर, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाती पहिली यादी जाहीर झाली आहे. 38 उमेदवारांची पहिली यादी अजित पवार गटाने जाहीर केली आहे. यामध्ये आता कोणत्या लाडक्या बहिणींना संधी मिळाली आहे? जाणून घ्या... (NCP Ajit Pawar Candidates in first list how many women canidate got ticket maharashtra vidhan sabha election 2024)
ADVERTISEMENT
भाजपाने पहिल्या यादीत 99, शिवसेना शिंदे गटाने 45 आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 38 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकूणच आता 106 जागांवर उमेदवार जाहीर होणं बाकी आहे. त्यामुळे कोणाच्या वाटेला सर्वात जास्त आणि कोणाच्या वाटेला कमी जागा येणार हे पाहणं रंजक असेल.
हेही वाचा : Ajit Pawar Candidates List: अजितदादांचा मोठा डाव, NCP ची पहिली यादी आली समोर
अजित दादा गटाने कोणत्या लाडक्या बहिणींना दिली संधी?
सध्या महाराष्ट्रात महायुतीची लाडकी बहीण योजना तुफान चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणलेली ही योजना महायुतीसाठी निवडणुकीत किती फायद्याची ठरतेय याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याचबरोबर महायुतीतील तिनही पक्षांची आता पहिली उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये भाजपने 13 महिला उमेदवार, शिवसेना शिंदे गटाने 3 महिला उमेदवार तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चार महिला उमेदवारांना संधी दिली आहे.
हे वाचलं का?
अजित पवारांनी पहिल्या उमेदवार यादीत चार महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं आहे. श्रीवर्धमधून आदिती तटकरे, नाशिक देवळालीमधून सरोज आहिरे, अमरावती शहरमधून सुलभा खोडके आणि पाथरी येथून निर्मला उत्तमराव विटेकर यांना तिकीट दिलंय.
हेही वाचा : Mahayuti : अजित पवारांमुळेच महायुतीला धोका? काय आहे राजकीय अर्थ?
राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी
- अजित पवार- बारामती
- दीलिप वळसे पाटील- आंबेगाव
- सुलभा खोडके- अमरावती
- दत्ता भरणे- इंदापूर
- अण्णा बनसोडे-पिंपरी
- निर्मला विटेकर-पाथरी
- सुनील शेळके-मावळ
- छगन भुजबळ- येवला
- हसन मुश्रीफ-कागल
- माणिकराव कोकाटे- सिन्नर
- नरहरी झिरवळ- दिंडोरी
- धनंजय मुंडे- परळी
- दौलत दरोडा- शहापूर
- हिरामण खोसकर- इगतपुरी
- अनिल पाटील- अमळनेर
- संग्राम जगताप- अहमदनगर
- आदिती तटकरे- श्रीवर्धन
- संजय बनसोडे- उदगीर
- बाबासाहेब पाटील- अहमदपूर
- दिलीप मोहिते-पाटील- खेड-आळंदी
- राजकुमार बडोले- अजुर्नी मोरगाव
- प्रकाश सोळंखे- माजलगाव
- मकरंद पाटील- वाई
- आशुतोष काळे- कोपरगाव
- इंद्रनील नाईक- पुसद
- भरत गावित- नवापूर
- मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला
- किरण लहामटे- अकोले
- शेखर निकम- चिपळूण
- यशवंत माने- मोहोळ
- राजेश पाटील- चंदगड
- हिरामण खोसकर- इगतपुरी
- राजू कारेमोरे- तुमसर
- चंद्रकांत नवघरके- बसमत
- नितीन पवार- कळवण
- धर्मराव बाबा आत्राम- अहेरी
- अतुल बेनके- जुन्नर
- चेतन तुपे- हडपसर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT