Sharad Pawar : "एक चांगला सहकारी गमावला...", मधुकर पिचड यांच्या निधनामुळे शरद पवारांचे डोळे पाणावले
Sharad Pawar On Madhukar Pichad Death : माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झाल्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. वयाच्या 84 व्या वर्षी पिचड यांनी अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन!

पिचड ब्रेन स्ट्रोकच्या आजाराने ग्रस्त

शरद पवारांनी मधुकर पिचड यांना वाहिली श्रद्धांजली
Sharad Pawar On Madhukar Pichad Death : माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झाल्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. वयाच्या 84 व्या वर्षी पिचड यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने नाशिकच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरु होते. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. पिचड यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार भावनाविवश झाले. पवारांनी माध्यमांशी बोलताना पिचड यांच्या आठवणींना उजाळा दिला.
शरद पवार काय म्हणाले?
मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. खूप वर्षांपासून त्यांच्याशी तुमचा संवाद होता, यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, "महाराष्ट्राच्या आदिवासी समाजासाठी ज्यांनी आयुष्य दिलं, अशा आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्याला आदरांजली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. पण ते आजारावर मात करतील, असा आम्हाला विश्वास होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलं".
हे ही वाचा >> CM फडणवीस शिवसेनेच्या 'या' नेत्यांचा कापणार पत्ता?, कॅबिनेटमध्ये स्थानच नाही?
शरद पवार पुढे म्हणाले, "शासनात काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांच्याकडे आदिवासी विभाग आणि अन्य काही खात्यांची जबाबदारी सोपवली होती. तिथेही त्यांनी अतिशय उत्तमरित्या काम केलं. शेतकऱ्यांसाठीही त्यांनी खूप मोठं योगदान दिलं. सहकारी चळवळीत, विशेषत: आदिवासी भागात साखर कारखान्याला उभारी दिली. आदिवासी समाजाचे लोकही अशी कारखानदारी उभी करू शकतात, असं उत्तम चित्र त्यांनी निर्माण केलं".
हे ही वाचा >> Madhukar Pichad Death : भाजपचे नेते मधुकर पिचड यांचं निधन! वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
"मधुकर पिचड यांच्यामुळे विविध क्षेत्रात, सहकार, शिक्षण, शेती, दलित, आदिवासी या सर्व क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं. माझे व्यक्तीगत सहकारी होतेच पण, आम्ही सर्वांनी एक चांगला सहकारी गमावल्याचं दु:ख आहे. त्यांचे पुत्र वैभव आणि कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्यासाठी शक्ती मिळो आणि त्यांनी उभ्या आयुष्यात जे काम केलं, त्याची नोंद महाराष्ट्र आणि समाज कायम करेल, असा मला विश्वास आहे", असंही शरद पवार म्हणाले.