Suraj Chavan: "...तरच धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल", संतोष देशमुख हत्याप्रकरणी सूरज चव्हाण यांचं मोठं विधान!

मुंबई तक

Suraj Chavan On Dhananjay Munde: "स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत, त्यांना कठोर शिक्षा व्हावी. त्यांचा खटला फास्टट्रॅकवर चालवावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून राहिली आहे".

ADVERTISEMENT

Suraj Chavan On Dhananjay Munde
Suraj Chavan On Dhananjay Munde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मंत्री धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार?

point

"या प्रकरणाची चौकशी तीन फेजमध्ये..."

point

सूरज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Suraj Chavan On Dhananjay Munde: "स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत, त्यांना कठोर शिक्षा व्हावी. त्यांचा खटला फास्टट्रॅकवर चालवावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून राहिली आहे. त्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, ते आमच्या पक्षाशी निगडीत असतील, तर त्यांच्यावर नक्कीच निलंबन केलं जाईल. आता या प्रकरणाची चौकशी तीन फेजमध्ये चालू आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून चौकशी चालू आहे. एसआयटी चौकशी करत आहे. तसच सीआयडी चौकशी करत आहे. या चौकशींती मुंडे साहेब दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु, त्यांचा अद्याप या घटनेशी संबंध नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, हे कुठंतरी राजकीय हेतूपोटी विरोधकांचा चाललेला डाव आहे", असं मोठं विधान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. 

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आर्थिक गोष्टींबाबतचे विषयही समोर आले आहेत, यावर प्रतिक्रिया देतना सूरज चव्हाण म्हणाले, त्या दोघांचे संबंध आहेत, हे धनंजय मुंडे साहेबांनी पहिल्या दिवशीच स्वीकारलं आहे. एखाद्या व्यक्तीचे वैयक्तीक संबंध असले म्हणजे त्या गुन्ह्याला प्रवर्त करणं किंवा त्या गुन्ह्यात सहभागी असणं त्याचा अर्थ होत नाही. परंतु, ना धनंजय मुंडे, ना वाल्मिक कराड अजून त्यात प्रत्यक्ष दोषी सापडले नाहीत. जर ते दोषी आढळले, तर पक्षाकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. परंतु, जाणीवपूर्वक त्यांच्या हेतूपोटी त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. आतापर्यंत ज्या यंत्रणेनं चौकशी केल्या आहेत, त्यांचा दुरान्वे कुठंही संबंध आढळलेला नाही.

हे ही वाचा >> Suresh Dhas : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार? सुरेश धस म्हणाले, "अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे..."

जे लोक त्यांच्यावर आरोप करतात, काही लोक स्वयं घोषित समाजसेवक म्हणून या महाराष्ट्रात वावरतात, त्यांचा हेतू होता की, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी. संतोष देशमुखाला न्याय भेटावा. परंतु, त्या कुठंतरी भरकटलेल्या आहेत. त्या वेगळ्या मुद्द्याकडे जातायत. अंजली दमानीया आणि सुरेश धस यांना हेच सांगेल की, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, हीच आपली भूमिका असावी. परंतु, त्यांच्या ज्या भूमिका आहेत, या राजकीय भूमिका आहेत. राजकीय हेतूपोटी भूमिका आहेत. तुम्ही एखाद्याच्या मृत्यूचं राजकारण करू नका. एव्हढीच माझी विनंती आहे. 

हे ही वाचा >> Manoj Jarange : "...तर तुमचा कार्यक्रम लावायला वेळ लागणार नाही", एकेरी उल्लेख करत CM फडणवीस यांच्यावर टीका

हे वाचलं का?

    follow whatsapp