शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले होते -जयंत पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

some leaders wanted sharad pawar should resign, big statement by jayant patil
some leaders wanted sharad pawar should resign, big statement by jayant patil
social share
google news

शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर ज्यांना अश्रू अनावर झाले, त्यापैकी एक नेते होते जयंत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटलांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. पण, नंतर शरद पवारांनी निर्णय मागे घेतला आणि सगळा गोंधळ थांबला. या सगळ्या नाट्यानंतर जयंत पाटील यांच्या एका विधानाने मात्र, अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. शरद पवारांनी राजीनामा द्यावा, यासाठी काही लोक देव पाण्यात घालून बसले होते, असं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील साखराळे या त्यांच्या मूळ गावी एक तास राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमात बोलत होते.

ADVERTISEMENT

2 मे रोजी शरद पवार यांनी घोषणा केली की, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही, तर महाराष्ट्र आणि देशातील राजकीय वर्तुळात त्यांची कंपने जाणवली. तीन दिवस यावरून राजकीय गोंधळ सुरू होता. देशातील विरोधी पक्षाच्या नेते, राष्ट्रवादीतील नेते, कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरल्यानंतर शरद पवारांनी निर्णय बदलला आणि चर्चेवर पडदा पडला.

“अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते”

या राजीनाम्याच्या वेगवेगळ्या कारणाचा उहापोह सुरू असतानाच जयंत पाटील यांनी एक विधान केलं. जयंत पाटील नक्की काय म्हणाले ते पाहूयात…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जयंत पाटील असं म्हणाले, “शरद पवार साहेबांच्या राजीनाम्यामुळे एक वादळ निर्माण झालं. ते वादळ त्यांच्या राजीनामा मागे घेण्याने शांत झालं. पण, चार दिवसांत टिव्ही सुरू केला की, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडी याच्याशिवाय काहीही दिसत नव्हतं. आणि बरेच लोक देव पाण्यात घालून बसलेले होते की, जे होतंय ते तसंच व्हावं. पण, आम्ही सगळ्यांनी आग्रह केल्यानंतर पवार साहेबांनी आपला निर्णय बदलला.” जयंत पाटील यांनी हे विधान सांगलीत केलं.

हेही वाचा >> “पोरं सांभाळायला गेलं, तर टोप पडतो”, उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचलं

पुढे जयंत पाटील असंही म्हणाले की, “एक चांगली सुरूवात पुन्हा नव्याने करण्याचा आम्हा सर्वांचा निर्धार आहे. काल पवार पत्रकार परिषदेत सांगितलं की, मी पुण्यात जाणार, तिथून पुढे जाणार… ते सुरुवातीपासून सांगत होते की, मी महाराष्ट्रात फिरणार आहे. मी दौरे ठरवलेले आहेत. पण, अध्यक्ष म्हणून पवार साहेब महाराष्ट्रात फिरणार. देशात फिरणार…”

ADVERTISEMENT

“आमच्या समितीत पी.सी. चाको आहेत. ते तर म्हटले की, काय चाललंय, असं शक्यच नाही. आम्ही वर्किंग कमिटीचे दहा सदस्य असतात. त्यातील चाको साहेब एक सदस्य, ते म्हणाले काँग्रेस सोडून इकडे आलो, का तर शरद पवार साहेबांच्या प्रेमाने आणि पवार साहेबच आज थांबायला लागले, तर आम्ही काय करायचं? त्यामुळे अशी सगळी लोक देशातील एकत्र आली आणि पवार साहेबांना निर्णय फिरवण्यास भाग पाडलं. आम्हीही निर्णयामुळे समाधानी आहोत”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी या सगळ्या प्रकरणावर मांडली.

ADVERTISEMENT

राहुल गांधींसह राजकीय नेत्यांचे फोन

“ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यावेळी राहुल गांधी, स्टॅलिन यासारख्या विविध पक्षांच्या नेत्यांनी त्याब फोन करून आता लोकसभेसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट करून लढायचे असताना राजीनामा न करण्याची विनंती केली असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

जयंत पाटलांचा रोख कुणाकडे?

शरद पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर जयंत पाटलांनी अशा पद्धतीचं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, काहीजण देव पाण्यात घालून बसले होते, या जयंत पाटील यांच्या विधानाचा रोख नेमका कुणाच्या दिशेने आहे.

हेही वाचा >> शरद पवारांच्या ‘हनुमंती’ डावाने अजितदादांचा केला ‘करेक्ट कार्यक्रम?’

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार हे एकमेव होते. अजित पवारांनी तर सर्वांना नव्या अध्यक्षाला तुमचा विरोध का? प्रश्नच त्यावेळी उपस्थित केला होता. महत्त्वाचं म्हणजे राजीनामा नाट्य घडलं, ते अजित पवारांमुळेच, असंही काही राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार भाजपसोबत जाण्यास इच्छूक आहेत. मात्र, पवारांचा याला विरोध आहे. त्यामुळे भाजपमधील कुणी देव पाण्यात घालून ठेवले होते का असाही मुद्दा यानिमित्ताने उपस्थित होत आहे. असं असलं तरी जयंत पाटील पक्षातील नेत्यांबद्दल बोलले की बाहेरच्या पक्षातील यावरून तर्कविर्तक लावणं सुरू झालं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT