Jayant Patil: 'दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुर्ची लाडकी...', लाडकी बहीण योजनेबाबत जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
Jayant Patil On Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून महाविकास आघाडीचे नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडवणीस-अजित पवारांवर निशाणा
लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटील यांनी महायुती सरकारला घेरलं
साताऱ्याच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान
Jayant Patil On Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून महाविकास आघाडीचे नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. महायुती सरकार या योजनेच्या माध्यमातून मतांचं राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) अर्थमंत्र्यांचे (अजित पवार) न ऐकताच दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून धडाधड योजना जाहीर करत आहेत, असं म्हणत पाटील यांनी निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
जयंत पाटील महायुतीवर टीका करत म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे पटत नसले तरी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपली खुर्ची लाडकी असल्याने ती सोडायला ते तयार नाही. खुर्चीसाठी काहीही म्हणणारे हे नेते बाणेदारपणा दाखवायला तयार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे शुक्रवारी साताऱ्यात स्वागत करण्यात आले. शाहू कलामंदिरात आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते.
हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana : चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? आकडा एकूण दिवाळी दणक्यात कराल साजरी!
हे वाचलं का?
जयंत पाटील म्हणाले, सध्याच्या राज्यकर्त्यांनी जीएसटी एवढ्या प्रमाणात वसूल केला. त्याच्या जीवावर चोचले पुरवले जात आहेत. लोकसभा निवडणुकीआधी सरकार जरा ताठ होते. मात्र, लोकसभा झाल्यावर सरकार मऊ झाले. शरण आल्यासारखे करत आहे. लोक जे मागतील ते द्यायला सरकार तयार आहे. आमदार, खासदार जे देत नाही, तेही द्यायला तयार आहे.
मात्र, जनतेच्या पदरात केवळ घोषणा पडणार आहेत. सरकारने केलेल्या घोषणांमुळे कामे करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारने केलेल्या घोषणांसाठी सर्व पैसे एकत्र करण्याचा प्रयत्न चालू आहे. वित्त विभाग, महसूल विभाग फाईलींवर योजनेसाठी पैसे नाहीत, असे लिहितो, तरीही रेटून निर्णय घेतले जातात, असं म्हणात पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT