Jitendra Awhad: "कलेक्टरची, एसपीची पहिली चौकशी सुरु करा...", परळी विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेवरून जितेंद्र आव्हाड संतापले
Jitendra Awhad Press Conference: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली असतानाच, आता बीडमधील परळी विधानसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानावरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जितेंद्र आव्हाड आणि राजाभाऊ देशमुखांनी बीड जिल्हा प्रशासनाचा घेतला समाचार

"कलेक्टर, एसपी आणि इलेक्शन कमिशन हे नोकरासारखे..."

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
Jitendra Awhad Press Conference: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली असतानाच, आता बीडमधील परळी विधानसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानावरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि परळी विधानसभा लढवलेले एनसीपीचे (शरद पवार गट) उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी निवडणूक आयोग, बीडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. "माझा स्पष्ट आरोप आहे की, जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर, एसपी आणि इलेक्शन कमिशन हे नोकरासारखे वागत होते. ही निवडणूक प्रक्रिया इलेक्शन बूथ कॅप्चर करण्यासाठी होती. आमची तक्रार आहे आता..या कलेक्टरची, एसपीची पहिली चौकशी सुरु करा. ज्यांनी या बीडचं वाटोळं केलं, त्या सर्वांची चौकशी होऊद्या", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, "निवडणुका झाल्यानंतर एकंदरीतच ईव्हीएम आणि निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड शंका निर्माण झाल्या. राजाभाऊ देशमुख हे आमचे राष्टवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे परळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार होते. उमेदवार असल्या कारणाने ते प्रत्येक बुथवर फिरायचे. बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघात 386 बूथ आहेत. लोकसभेनंतर झालेल्या धांदलीनंतर हायकोर्टाने त्याच्यातले 122 बूथ हे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केले. त्यांना एक्स्ट्रा प्रोटेक्शन देण्याची व्यवस्था करा, असं हायकोर्टाने सांगितलं. जबाबदारी कुणावर आली, जिल्हा प्रशासन, कलेक्टर, पोलीस आणि इलेक्शन कमिशनवर.."
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : "ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना...", उद्धव ठाकरे कडाडले, बाळासाहेबांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, "या इलेक्शनमध्ये 201 बुथवर हल्ले झाले आणि 201 बूथ कॅप्चर केले गेले. ज्या 122 बूथची नावं देण्यात आली होती, ज्याच्यावर एक्स्ट्रा प्रोटेक्शन आणि सीसीटीव्ही कॅमेरा द्या, सीआरपीएफचे वेगळे जवान द्या, असं सांगितलं पण काहीही केलं नाही आणि 122 बूथ कॅप्चर करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या थोबाडीत मारल्यासारखं ही प्रक्रिया वापरली गेली. माझा स्पष्ट आरोप आहे की, जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर, एसपी आणि इलेक्शन कमिशन हे नोकरासारखे वागत होते. ही निवडणूक प्रक्रिया इलेक्शन बूथ कॅप्चर करण्यासाठी होती".
हे ही वाचा >> Pune Crime : तुरूंगातून सुटलेल्या गुंडांची जिथं मिरवणूक निघाली, पोलिसांनी तिथेच धींड काढली
आमची तक्रार आहे आता..या कलेक्टरची, एसपीची पहिली चौकशी सुरु करा. ज्यांनी या बीडचं वाटोळं केलं, त्या सर्वांची चौकशी होऊद्या. ईव्हीएम मशिनवर ऑब्जेक्शन घेतलं, तेव्हा जर्मनीच्या कोर्टाने सांगितलं, काय खरं काय खोटं हे न सांगता, जर सर्व सामान्य माणसांना मतदान प्रक्रियेत संशय आला असेल, तर ही प्रक्रिया रद्द करा. याचं कारण मतदानावर जर लोकांचा विश्वास नाही, याचा अर्थ त्यातून येणाऱ्या निर्णयावरही लोकांचा विश्वास राहणार नाही आणि यात लोकशाही पराभूत होते. लोकशाहीत लोकांचा विश्वास बसला पाहिजे. इथे शंभर टक्के बूथ लुटले जातात. हे तर बिहारमध्येही होत नसेल. 2014 पूर्वी इतका माजोरडेपणा बीडमध्ये नव्हता. एका मोठ्या उंचीचा नेता गोपिनाथरावजी मुंडे हे त्या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते, असंही आव्हाड म्हणाले.