'बुरखा पोरीच घालतात..कॉपी काय फक्त पोरीच करतात? उद्या साड्यांवर..', जितेंद्र आव्हाडांचा नितेश राणेंवर हल्लाबोल
भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची मागणी नुकतीच केलीय. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बुरखा घालण्यावर बंदी"

नितेश राणेंच्या मागणीबाबत जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

"कोणत्या बुरख्यातून कोणती पोरगी काढणार कॉपी.."
Jitendra Awhad On Nitesh Rane : भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची मागणी नुकतीच केलीय. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा असणार आहेत, त्यामुळे राणेंच्या या मागणीबाबत शिक्षण विभाग कोणता निर्णय घेतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला आहे. आव्हाड राणेंवर टीका करत म्हणाले, "चेहरा स्ट्रेट ठेऊन हातातून चिठ्ठी काढायची आणि ती खाली उघडायची आणि असं बघता बघता पेपर लिहायचा ही सोपी गोष्ट नसते. कोणत्या बुरख्यातून कोणती पोरगी काढणार कॉपी..बुरखा पोरीच घालतात ना..कॉपी काय फक्त पोरीच करतात? मग उद्या साड्यांवर बंदी घालाल. साडी नाही घालायची म्हणून.."
जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
"कॉपी कशी करतात, हे पाहायला शाळेत जावं लागतं. यासाठी थोडी मस्ती करावी लागते. याच्यासाठी कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये बसावं लागतं. उडाणपट्टू कल्पना करावी लागते. मग कॉपी कशी करतात याची आपल्याला माहिती मिळते. लोकं हे टिंगळ टवाळीत घेतील की, जितेंद्र आव्हाड काय बोलतात. कॉपी करण्याला काही स्कील असतं. प्रत्येक जण कॉपी करू शकत नाही. चेहरा स्ट्रेट ठेऊन हातातून चिठ्ठी काढायची आणि ती खाली उघडायची आणि असं बघता बघता पेपर लिहायचा ही सोपी गोष्ट नसते. कोणत्या बुरख्यातून कोणती पोरगी काढणार कॉपी..बुरखा पोरीच घालतात ना..कॉपी काय फक्त पोरीच करतात? मग उद्या साड्यांवर बंदी घालाल. साडी नाही घालायची म्हणून..ड्रेसकोडवर कॉपी होते का? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा >>Namdev Shastri: "मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त...", देशमुख कुटुंबीय भगवानगडावर पोहोचल्यावर नामदेव शास्त्री काय म्हणाले?
बुरख्याची जर रचना बघितली, तर ती कॉपी कुठून बाहेर काढेल? दोन हातांनी कॉपी बाहेर काढावी लागते ना.. मग ती कॉपी कशी बाहेर काढेल? तुम्ही काय बोलता? याचा तर विचार करा. काय वाट्टेल ते बोला आता तुम्ही..तुमच्याकडे आता 240 आमदारांची मेजॉरिटी आहे. आमच्या धर्मात हे कराल, तर मारून टाकू. तो जिवंत राहील, नाहीतर तो मरेल. आपल्याला कोण विचारणार आहे..ना मुख्यमंत्र्यांचं तुम्ही ऐकता..ना मुख्यमंत्र्यांचा तुम्ही सन्मान ठेवता..ना तुम्हाला महाराष्ट्राच्या धर्माबद्दल काही माहिती आहे. धर्म कोणाच्या बापाची मालमत्ता नाहीय. बोलणाऱ्यांना जेव्हढा धर्म समजतो, तेव्हढाच धर्म आम्हाला समजतो. आम्ही त्याच धर्मात जन्माला आलोय, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.