Lok Sabha 2024 : सत्तेच्या ‘हॅटट्रिक’साठी खास स्ट्रेटजी! 338 खासदारांच्या 10 टीम, मोदी बघणार रिपोर्ट

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Lok Sabha 2024 : The NDA currently has 338 members in the Lok Sabha. NDA MPs are divided into 10 groups.
Lok Sabha 2024 : The NDA currently has 338 members in the Lok Sabha. NDA MPs are divided into 10 groups.
social share
google news

Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात भाजपप्रणित एनडीए आणि विरोधी पक्षांच्या इंडिया या आघाडीची बैठक झाली. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दुहेरी लढत होणार, हे आता दिसून लागलं आहे. 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पूर्ण ताकदीने तयारी सुरू केली आहे. 2014, 2019 मध्ये जिंकल्यानंतर एनडीए 2024 मध्ये हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळेच एनडीएने मोठा आराखडा तयार केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रोज एनडीएच्या खासदारांची बैठक घेणार आहेत.

ADVERTISEMENT

एनडीएचे सध्या लोकसभेत 338 सदस्य आहेत. एनडीएच्या 338 खासदारांचे 10 गट तयार केले जाणार आहे. 25 जुलैपासून या बैठकांना सुरुवात होणार आहे. प्रत्येक गटात विशिष्ट मतदारसंघातील 35 ते 40 खासदार असणार आहेत. 2024 च्या निवडणुका तोंडावर आल्याने या बैठकाही महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

प्रादेशिक विभागानुसार खासदारांचे गट

खासदार प्रादेशिक आधारावर गटांमध्ये विभागले गेले आहेत. प्रत्येक गटात दोन प्रदेशातील खासदारांचा समावेश असणार आहे. पहिल्या दिवशी 25 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील नेत्यांची भेट घेणार आहेत. या बैठका दोन वेगवेगळ्या वेळी होणार आहेत. पहिली संध्याकाळी साडेसहा वाजता आणि दुसरी संध्याकाळी साडेसात वाजता.

हे वाचलं का?

वाचा >> Crime: ‘माझी आई मरून जाईल’, डॉक्टरला घरी बोलवलं अन् तरुणी झाली नग्न; नंतर…

पंतप्रधान विकासकामांचा घेणार फीडबॅक

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. तिन्ही नेते खासदारांशी चर्चा करतील आणि त्यांच्या भागातील समस्या आणि विकासकामांबाबत अभिप्रायही घेतील. त्याचबरोबर संजीव बल्यान आणि अजय भट्ट यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर बैठकांच्या समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरचिटणीस तरुण चुग आणि राष्ट्रीय सचिव ऋतुराज सिन्हा समन्वय करणार आहेत.

वाचा >> Lok Sabha 2024 : विरोधकांना UPA विसर्जित करून INDIA बनवण्याची गरज का पडली?

एनडीए पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लढवणार निवडणूक

दरम्यान, खासदारांना त्यांच्या कामकाजाचा अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. एनडीएला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या बैठका होत आहेत. याआधी 18 जुलै रोजी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये आघाडीत सहभागी असलेल्या 39 पक्षांची बैठक झाली होती. एनडीएने दावा केला की ते 2024 च्या लोकसभा निवडणुका पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली लढतील आणि प्रचंड बहुमताने सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येतील.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT