NCP: “शरद पवारांनी अजित पवारांना मामा बनवलं”, निखील वागळेंचं स्फोटक विश्लेषण

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

sharad pawar resignation : nikhil wagle opinion on ncp political crisis and ajit pawar future politics
sharad pawar resignation : nikhil wagle opinion on ncp political crisis and ajit pawar future politics
social share
google news

Sharad Pawar resignation meaning : शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. त्यानंतर अशी एक चर्चा सातत्याने सुरू आहे की, हे सगळं शरद पवारांनीच घडवून आणली. त्यामागच्या कारणाचाही उहापोह सातत्याने राजकीय विश्लेषक, राजकीय वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांकडून केला जात आहे. दरम्यान, शरद पवारांनी नेमलेल्या अध्यक्ष निवड समितीने त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा एकमताने नामंजूर केला आहे. समितीतील नेते शरद पवारांची भेट घेणार असून, अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी मनधरणी करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेला आहे. या सगळ्याचा अर्थ काय हेच आपण समजून घेऊयात… (what is meaning of sharad pawar resignation decision?)

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी शरद पवारांनी एक समिती नियुक्त केली होती. या समितीने शरद पवारांचा राजीनामा नामंजूर केला आहे. त्यामुळे आधी समजून घेऊयात की समितीची भूमिका काय आहे?

अध्यक्ष निवड समितीचा ठराव काय?

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी समितीच्या बैठकीनंतर काय सांगितलं, ते आधी बघूयात…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पटेल म्हणाले, “आज समितीने या बैठकीमध्ये एक ठराव मंजूर केला आहे. आणि सर्वानुमते आणि मंजूर केला आहे. हा ठराव घेऊन आम्ही शरद पवार यांना भेटण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्यक्षपणे सुद्धा आम्ही आमच्या प्रस्तावाबद्दल त्यांना भेटून विनंती करणार आहोत.”

हेही वाचा >> मोठी ब्रेकिंग : शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळला! बैठकीत काय झालं?

“प्रस्ताव आम्ही असा केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवारसाहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून, त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे”, असा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला.

ADVERTISEMENT

‘राजीनामा’स्त्र शरद पवारांची राजकीय खेळी?

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करण्यापूर्वी महाराष्ट्रात एक महत्त्वाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. ती होती अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपसोबत जाण्याची. याबद्दल पवारांनीच उद्धव ठाकरेंच्या बैठकीत स्पष्टपणे भूमिका मांडली होती. त्याच्या काही दिवसानंतरच पवारांनी ‘राजीनामा’स्त्र बाहेर काढलं.

ADVERTISEMENT

Explainer : शरद पवार यांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सैल होणार?

पवारांची ही खेळी अजित पवार आणि भाजपसोबत जाऊ इच्छिणाऱ्या आमदारांना कोडींत पकडण्यासाठी असल्याची खेळी असल्याचा सूर राजकीय वर्तुळात आहे. शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यापर्यंत आता या घडामोडी आल्या असून, याबद्दल ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी मुंबई Tak शी बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.

हेही वाचा >> Sharad Pawar: कात्रजचा घाट, तेल लावलेला पैलवान.. ‘पॉवर’फुल पवारांचे प्रचंड इंटरेस्टिंग किस्से!

वागळे म्हणाले की, “शरद पवार यांच्यापुढे आता काही पर्याय नाहीये. हे जे नाट्य सुरू होतं, त्याची सांगता जवळ आली आहे. राजीनामा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार आणखी काय सांगणार आहेत? पण, त्यात काही अटी ते घालू शकतात. जसं की सुप्रिया सुळे किंवा इतर कुणाला कार्याध्यक्ष करणं. आता शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याशिवाय पर्याय नाही.”

“शरद पवार आणि प्रतिभाताईंनी अजित पवारांना मामा बनवलं”

निखील वागळे म्हणाले, “मला वाटतं हे नाट्य अजून संपलेलं नाहीये. शरद पवारांचा राजीनामा हे जर नाटक असेल, तर ते दोन किंवा तीन अंकात संपुष्टात येईल. शरद पवार आणि प्रतिभाताई यांनी मिळून अजित पवारांचा पुन्हा एकदा मामा केला. ते पुतणे आहेत, पण मामा केला आहे. त्यादिवशी ते सांगत होते की, हे स्वीकारलं पाहिजे. आज प्रफुल्ल पटेलही काय म्हणाले ते आपण ऐकलं आहे. तेही या मताचे होते की, पवारांना विश्रांती दिली पाहिजे. ते आज वेगळं बोलले. त्यामुळे अजित पवारांनी भूमिका बदलली आहे का? हा प्रश्न आहे. आता काकाचं नाटक संपलेलं आहे, पण पुतण्याचं भवितव्य काय या नाटकाचा जन्म होणार आहे”, असं विश्लेषण निखील वागळे यांनी केलं.

अजित पवार काय करणार?

निखील वागळे यांनी अजित पवारांच्या भवितव्याबद्दलही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, “अजित पवार आता काय करणार आहेत? यात पहिला मुद्दा असा की, अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार आहेत का? त्यांनी भाजपसोबत जाण्यासाठी ज्या बॅगा भरून ठेवल्या आहेत. त्या बॅगा ते तशाच ठेवणार आहेत की या नाट्यानंतर रिकाम्या करणार आहेत? हे बघणं औत्सुक्याचं असेल. शरद पवारांनी गुगली टाकून अजित पवारांना जवळजवळ क्लीनबोल्ड केलं आहे. अजित पवार त्या समितीत होते पण, त्यांनी विरोध केलेला नाही. समितीने एकमताने निर्णय घेतला आहे. त्याचा अर्थ असा की अजित पवारांचा या निर्णयाला पाठिंबा आहे. त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत, हे पुन्हा सिद्ध झालं आणि त्यांनी तसा मेसेज दिला आहे, असं मला वाटतं”, असं मत वागळे यांनी या सगळ्या घटनेवर मांडलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT